शरद गायकवाड यांना 'क्रांतीबा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक' पुरस्कार
schedule30 Aug 24 person by visibility 471 category
कोल्हापूर ;
महावीर कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड यांना 'क्रांतीबा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक' पुरस्कार देण्यात येत आहे. कृती फाउंडेशन यांच्या वतीने राजर्षी शाहु स्मारक भवन, कोल्हापूर येथे रविवारी 1 सप्टेंबर रोजी पुरस्काराचे वितरण होणार आहे.
डॉक्टर गायकवाड यांनी आतापर्यंत राज्यासह देशभर,व आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ, लहुजी वस्ताद यांचे विचारांचा प्रसार केला आहेत. प्रसिद्ध वक्ता म्हणून त्यांनी देशभर नावलौकिक मिळवला आहे.
साहित्यिक क्षेत्रात सुद्धा अमूल्य कामगिरी केले आहे आतापर्यंत त्यांचे तेरा प्रबोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. विविध स्तरावर त्यांचं निबंध प्रकाशित झाले आहेत.
आतापर्यंत 38 पोतराज निर्मूलनात त्यांनी पुढाकार घेतला. मातंग समाजामध्ये सहा बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले.आंबेडकरी विचारवंत म्हणून आज बोटावर मोजणे इतकीच नावे शिल्लक आहेत त्यापैकी एक नाव म्हणजे डॉक्टर गायकवाड यांचे घेता येईल.
त्यांच्या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येत आहे.