धनंजय महाडिक यांच्या पुत्र प्रेमामुळे सत्यजित कदम शिवसेनेत
schedule05 Nov 24 person by visibility 1068 category
कोल्हापूर आवाज इंडिया
खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचा मुलगा कृष्णराज यांचे नाव कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी पुढे केले. आता नाही 2029 चे टारगेट त्याचे असेल असेही महाडिक यांनी सांगितलं यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी इच्छुक असलेले सत्यजित उर्फ नाना कदम नाराज झाले. भविष्यात भाजपमध्ये आपल्याला काहीच मिळणार नाही यामुळे त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला असल्याचं सांगण्यात येत आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात इच्छुक असून आपण विकास काम केले असलेले डिजिटल बोर्ड सत्यजित कदम यांनी शहरात लावले होते. अर्थात प्रत्येक बोर्डवर धनंजय महाडिक यांचा फोटो होता व त्यांच्या सहकार्याने निधी खर्च केला असल्याचं उल्लेख होता.
धनंजय महाडिक यांनी सुद्धा उत्तर मध्ये आपल्या मुलाचं नाव रेटण्यात सुरुवात केली होती. सत्यजित कदम इच्छुक असून सुद्धा भाजपमधून कृष्णराज यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. सत्यजित कदम यांनी विकास कामे केली असली तरी ते आपल्या मदतीनेच केली. त्यामुळे मुलग्याला उमेदवारी मागण्यात काय चूक नाही असेही त्यांना वाटत असावं म्हणूनच त्यांनी मुलाचे नाव कायम पुढे केले. हे ओळखूनच कदम यांनी विधानपरिषद किंवा नियोजन मंडळ कार्याध्यक्ष पदाचा शब्द शिवसेनेकडून घेण्यात आला. त्यामुळेच सत्यजित कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं बोलले जातात.