विशाल अनिल आवडे यांना पुरस्कार
schedule07 Oct 24 person by visibility 128 category
हेल्थ प्रो प्रा लि. ही सामाजिक संस्था आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र. गेले 2015 पासून देश भर व्यसनमुक्ती, मधुमेह मुक्ती, रोगमुक्ती, शिशु रक्षा व वेदनामुक्ती अशा महत्वाच्या व घरोघरी अत्यंत गरज असणाऱ्या विषयावर कार्य करत आहे.
संस्थेचे हे आभियान घरोघरी पोहचवण्या साठी संस्थेकडे प्रशिक्षित हजारो PRO, डॉक्टर्स, सोशल वर्कर, शिक्षक, विध्यार्थी, रिटायर पर्सन व गृहिणी आहेत यांच्या माध्यमातून लाखो लोकांना फायदा होत आहे.
आपल्या संपर्कातील लोकांना त्यांच्या व्याधीतून बाहेर काढण्यासाठी योग्य उपचार, आहार, पत्य तसेच व्यायाम संदर्भात योग्य मार्गदर्शन करणे हे काम अहोरात्र ही सर्व लोक करत आहेत.
या कार्यामुळे अनेक कुटूंबाना नवसंजीवनी मिळत आहे. याची दखल घेऊन दर वर्षी प्रमाणे, या ही वर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या PRO, ना संस्थेकडून "राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार" देऊन उचित सन्मान केला जाणार आहे.
या वर्षी ही हजारो PRO, मधून निवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल संस्थेच्या PRO कु. विशाल अनिल आवडे, शिंगणापूर कोल्हापूर रा यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.