29 बंधारे पाण्याखाली : राधानगरी धरणातून 3028 क्युसेक विसर्ग
schedule17 Aug 22 person by visibility 629 categoryसामाजिक
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 235.14 दलघमी पाणीसाठा आहे. सकाळी 7 वाजताच्या अहवालानुसार राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 6 खुला असून सध्या धरणातून 3028 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगांव व खडक कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण व ठाणे आळवे, वेदगंगा नदीवरील- बस्तवडे व चिखली, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली व बाचणी, तुळशी नदीवरील- बीड असे 29 बंधारे पाण्याखाली आहेत.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 235.14 दलघमी, तुळशी 95.19 दलघमी, वारणा 873.56 दलघमी, दूधगंगा 645.99 दलघमी, कासारी 74.91 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 71.60 दलघमी, पाटगाव 99.07 दलघमी, चिकोत्रा 42.36 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जंगमहट्टी, जांबरे, चित्री मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 32 फूट, सुर्वे 33.4 फूट, रुई 64 फूट, इचलकरंजी 60.6 फूट, तेरवाड 56 फूट, शिरोळ 50.3 फूट, नृसिंहवाडी 50.6 फूट, राजापूर 41.3 फूट तर नजीकच्या सांगली 24.6 फूट व 30.5 फूट अशी आहे.