दुसरा नीतीप्रज्ञ न्यायरक्षक पुरस्कार ॲड. प्रशांत चिटणीस यांना जाहीर
schedule19 Aug 22 person by visibility 229 categoryसामाजिक

असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर येथील धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट ही मानवतावादी भूमिका घेऊन संविधान व लोकशाही मूल्यांची जोपासना करण्यासाठी प्रबोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असणारी महत्वपूर्ण सामाजिक संस्था असून... या संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी मानून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व खासकरून कायद्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विधिज्ञास नीतीप्रज्ञ न्यायरक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. या वर्षीचा धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टचा नावाजलेला मानाचा, सन्मानाचा दुसरा "नीतीप्रज्ञ न्यायरक्षक" पुरस्कार - 2022 ज्येष्ठ कायदेतज्ञ, भारतीय संविधानाचे अभ्यासक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान असणारे व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. प्रशांत चिटणीस यांना जाहीर करण्यात आला असून सन्मानचिन्ह, रोख पाच हजार रुपये व दहा हजार रुपयांची पुस्तके असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 4:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे माजी चेअरमन ॲड. महादेवराव आडगुळे आणि लातूरचे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. मंचकराव डोणे यांच्या हस्ते होणार असून या पुरस्कार वितरण समारंभास बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे उपाध्यक्ष ॲड. विवेकानंद घाटगे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, निर्मिती विचारमंच, कोल्हापूरचे अध्यक्ष अनिल म्हमाने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या पुरस्कार वितरण समारंभास कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आसे आवाहन मुख्य निमंत्रक व धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेस सहनिमंत्रक डॉ. दयानंद ठाणेकर, प्रा. डॉ. शोभा चाळके, अमित मेधावी, विमल पोखर्णीकर, अरहंत मिणचेकर, सनी गोंधळी, राहुल काळे, भरत गुरव, सनी येळावकर यांच्यासह पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ॲड. अकबर मकानदार, सचिव सुरेश केसरकर, ॲड. योगेश पाटील, ॲड. अतुल जाधव, ॲड. सचिन आवळे, ॲड. शैलजा चव्हाण, ॲड. अधिक चाळके, ॲड. अभिजित बच्चे-पाटील, ॲड. योगेश केसरकर आदी उपस्थित होते.