S3 सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग*
schedule18 May 24 person by visibility 232 category

कोलहापूर
S3 सॉकर अकॅडमी आणि पालक यांच्यावतीने आयोजित १०, १२ , १४ वर्षाखालील खेळाडूंच्या फुटबॉल स्पर्धेला मेरी वेदर मैदानावार उत्साहात सुरुवात झाली .कोल्हापूर जिल्ह्यातील विविध फुटबॉल अकॅडमी मधील ३५ संघातील ३५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यंदाचे वर्षे हे या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे .
लहान फुटबॉल खेळाडूंमध्ये क्रीडा कौशल्य आणि संघभावना वाढीस लागावी यासाठी.पालकांनी आणि क्रीडा प्रशिक्षक यांनी पुढाकार घेऊन ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.महादेव नरके, उद्योजक अभय देशपांडे, उद्योजक संजय भगत, उद्योजक संजय कदम , रोटरी सेंट्रल क्लबचे सेक्रेटरी रविराज शिंदे,पांडुरंग पाटील, विकी मोरे,प्रशांत साळोखे यांच्या हस्ते झाले.
अमित साळोखे ,निखिल सावंत, संतोष कुंडले, प्रमोद खवरे, शोएब बागवान ,सौरभ भोसले, यश खानविलकर,अवधूत भाटे, मंगल भाटे यांच्यासह पालकांनी संयोजन केले आहे.