Awaj India
Register
Breaking : bolt
रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ*डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सर्वसाधारण विजेतेपद*लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय :आमदार सतेज पाटील आनदराव पाटील चुयेकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७%नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्केडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल ९९.१७ टक्के*मित्र-मैत्रिण नाते किती ग्रेट?निवडणुकीनंतर लाडकी बहीण राज्य सरकारला सावत्र झाली; आमदार सतेज पाटील यांची टिका...शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज ; अरुण डोंगळेशालेय आयडी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : प्रवीणभाई माणगावे

जाहिरात

 

१६०० मतांचा फरक ८२४ पेक्षा निश्चितच मोठा - अमल महाडिक

schedule07 Sep 23 person by visibility 168 category


कसबा बावडा- 

आमचे सत्तारूढ पॅनेलचे सर्व उमेदवार सरासरी १६०० मतांनी विजयी झालेले आहेत. हा फरक ८२४ पेक्षा निश्चितच मोठा आहे. सदरचा बेकायदेशीर आदेश दिलेला आहे. असे स्पष्टीकरण माजी आमदार अमर महाडिक यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे दिले.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदत्वाबाबत पुन्हा एकदा गैर मार्गाने सभासदांच्यावर अन्याय करून त्यांचा हक्क हिरावून घेण्याचा दुर्देवी प्रयत्न विरोधकांनी केलेला आहे. तो आम्हास व सभासदांना कदापीही मान्य नाही.

मा. सर्वोच्च न्यायालयाने या सभासदांना न्याय देऊन फेर तपासणीचे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांना दिलेले होते. यामध्ये न्यायालयाने सभासदांना त्यांच्या विषयी काय तक्रार आहे व त्या सोबत कोणती कागदपत्रे जोडली आहेत आणि स्क्रुटिनी रिपोर्ट उपलब्ध करून देणे विषयी निर्देश दिले होते. तथापी या पैकी कोणतीही कागदपत्रे त्या सभासदांना उपलब्ध करून देणेत आलेली नाहीत. तसेच रितसर कागदपत्रे हजर करणेस पुरेसा वेळ दिलेला नाही. त्यांचे रितसर म्हणणे आणि कागदपत्रांची कायदेशिर योग्य छाननी प्रादेशिक सहसंचालकानी केलेली नाही.असे महाडिक यांनी पत्रकात म्हटले आहे.
प्रादेशिक सहसंचालकांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे कोणतेही पालन न करता विरोधकांनी परस्पर दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे सदरचा बेकायदेशीर आदेश दिलेला आहे. प्रादेशिक सहसंचालकांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन न करता दिलेल्या या आदेशा विरोधात त्यांच्या विरुध्द सभासदांचेकडून आम्ही अवमान याचिका देखील दाखल करणार आहोत. तसेच यासाठी पुन्हा एकदा आम्ही या सभासदांना न्याय देण्यासाठी या निकाला विरोधात राज्य सरकारकडे अपिल करणार आहोत सदरचा प्रादेशिक सहसचालकांचा आदेश हा समासदांच्या आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या विरोधातील असून या निकालाला स्थगिती मिळविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे ठामपणे अभिवचन देतो.

प्रादेशिक सहसंचालकांनी दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने बंटी पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेली वक्तव्य बालीशपणाचे आहेत. प्रत्यक्षात या निकालाचा कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणूक निकालाशी कोणताही काडीचा संबंध नसताना कायदेशिर प्रक्रियेनुसार पार पडलेल्या निवडणूकीच्या संदर्भात करून ते सभासदांच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ म्हणजे फक्त राजकीय गट सांभाळणे एवढ्याच पुरता मर्यादित असून, त्यांच्या गटाच्या पराभूत उमेदवारांना मी काही तरी करून दाखवतोय आहे असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.

या निकालामध्ये मोठीमोठी आकडेवारी सांगून सभासदामध्ये निष्कारण चुकीची माहिती सांगण्याची उठाठेव से करीत असून खूप मोठ्या संख्येने १८९९ सभासदांचा प्रश्न असल्याचे ते भासवत आहेत. प्रत्यक्षात यापैकी ५५८ सभासद पात्र ठरले आहेत आणि ३३९ भादोले येथील सभासद मतदानास यापूर्वीच कारखान्याने उगळले होते. उर्वरित पैकी १०७ सभासद मयत आहेत. २ सभासद शेअर्स रद व अन्य नावे वर्ग झालेले आहेत. ही संख्या विचारात घेता हा विषय ८२४ सभासदापुरताच संबंधित येतो. हे ८२४ सभासद मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने निवडणूकीच्या वेळी पात्रच होते. तरी देखील नुकत्याच झालेल्या निवडणूकीचा निकाल पाहता मी स्वतः सर्वाधिक २२०५ मतांनी व आमचे सत्तारूढ पॅनेलचे सर्व उमेदवार सरासरी १६०० मतांनी विजयी झालेले आहेत. हा फरक ८२४ पेक्षा निश्चितच मोठा आहे. त्यामुळे या सभासदांच्या जीवावर सत्ता मिळविली हे सतेज पाटलांचे वक्तव्य पोरकटपणाचे ठरते. खरे पाहता २१-० झालेला दारूण पराभव त्यांना चार महिने उलटले तरीही पचवता आलेला नाही, हेच सुर्यप्रकाशा इतके खरे सत्य आहे.


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes