शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर धरणात पर्यटनासाठी आलेला व्यक्ती धबधब्याच्या पाण्यात बुडाला
schedule17 Aug 22 person by visibility 179 categoryसामाजिक
पांडुरंग सोनू कांबळे : आवाज इंडिया प्रतिनिधी
पावनखिंड - शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर धरणात पर्यटनासाठी आलेला व्यक्ती धबधब्याच्या पाण्यात बुडाला.बुडालेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षा कडून घटनास्थळी जवान दाखल झाले आहेत. घटनास्थळी शाहूवाडी पोलीस पीएसआय प्रसाद कोळपे हे गेले दोन दिवस तिथे उपस्थित आहेत.
विकास बाजीराव माळी राहणार लाटवडे तालुका हातकणंगले यांनी शाहूवाडी पोलिसांना दिलेली माहितीनुसार, राजेश बाबुराव पाटील वय वर्ष 35 राहणार लाटवडे हा पालेश्वर धरणाच्या धबधब्याचे परिसरातील पाण्यामध्ये बुडाला असल्याचे सांगितले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जवान प्रयत्न करत आहेत. पाण्याचा जोर कायम असल्याने शोध पथकाला अडथळा निर्माण होत आहे. तसेच पाऊस सुद्धा जोरात आहे. त्यामुळे शोध मोहिमेत वेळ लागत आहे. यावेळी उपस्थित नायब तहसीलदार रवींद्र मोरे, घटनेची माहिती मिळता तत्काळ उपस्थित झालेले जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सर्जेराव पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत.