+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustआ. जयश्री जाधव यांनी शहरातील प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले adjust*प्रा. अश्विनी चौगुले यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार adjustसाखर कारखान्यात काटा मारणाऱ्या महाडीकांचा आता काटा काढा adjustअभियंत्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे : उपअभियंता धनंजय भोसले adjustहुकूमशाही बघायची असेल तर डी वाय साखर मध्ये डोकावून बघा - अमल महाडिक adjustसत्तारूढ सहकार आघाडीबाबत सभासदांमध्ये सकारात्मकता - अमल महाडिक adjustडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये घाटगे पाटील इंडस्ट्रीजच्या पुल कॅम्पस इंटरव्यू* adjustडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये घाटगे पाटील इंडस्ट्रीजच्या पुल कॅम्पस इंटरव्यू adjustजिल्ह्याच्या शिक्षण विकास निर्देशांकामध्ये* *शिक्षक व रोटरीने भरीव योगदान द्यावे- आम.सतेज पाटील adjustराजाराम कारखाना 122 गावातील सभासदांचा आहे, तसाच राहणार ! - अमल महाडिक*
schedule31 Jan 23 person by visibility 550 category


सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी.

कोल्हापूर आवाज इंडिया प्रतिनिधी:

मौजे शेनवडे (ता. गगनबावडा) येथे भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस पाटील यानाच मारहाण झाली. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेलेल्या पोलीस पाटलावरच गुन्हा नोंद केला असल्याचाप्रकार घडला आहे. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी पोलीस प्रमुख यांच्याकडे केली आहे.

भारत मुक्ती मोर्चाच्यावतीने जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांच्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला. पाटील यांच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 दोन इसमामध्ये भांडण लागले असता उत्तम पाटील हे पोलीस पाटील असल्यामुळे सदर ठिकाणी वाद मिटवण्यासाठी तेथे गेले होते. राजकीय वैमनस्यातून त्यांनाच मारहाण करण्यात आली.
पाटील पोलीस स्टेशन गगनबावडा येथे गेले असताना सुद्धा त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यांनाच आरोपी सारखी वागणूक देऊन दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये थांबवण्यात आले. त्यांच्यावरच पूर्वगृहातून गुन्हा नोंद करण्यात आला असे निवेदनात म्हटले आहे.
         उत्तम पाटील हे स्वतः पोलीस पाटील म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांना मारहाण झाल्याबद्दल ते पहिल्यांदा तक्रार नोंदवण्यासाठी गेले असतानासुद्धा त्यांची तक्रार नोंदवून न घेता, विरोधी पक्षाची तक्रार नोंदवून घेऊन या प्रकरणांमध्ये स्वतः रणजीत पाटीलच न्यायाधीशांची भूमिका बजावत असल्याचे जाणवत आहे. असा आरोप निवेदनात केला आहे.
   उत्तम पाटील यांना पोलीस पाटील पदाचे कर्तव्य बजावत असताना मारहाण झाले बाबतची त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात यावी व सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांनी तक्रार नोंदवून न घेतले बाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 
       निवेदनावर महेश बावडेकर, मदन सरदार, शहाजी सुभेदार, चंद्रकांत नागावकर,राहुल कांबळे, स्मिता सरदार, मनोहर चौगुले आदींच्या सह्या आहेत.