गडहिंग्लज शाखेच्या भ्रष्टाचारी प्रकरणी दोषीवर कारवाई होणार
schedule13 Jan 23 person by visibility 286 categoryराजकीय
सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांमुळे संस्थेवर आर्थिक नुकसानीचा बोजा कोणामुळे सचिन जाधव यांचा घाणाघात
कोल्हापूर आवाज इंडिया प्रतिनिधी
गडहिंग्लज शाखेच्या भ्रष्टाचारा प्रकरणी दोषीवर कारवाई होणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याची टीका पॅनल प्रमुख सचिन जाधव यांनी केली.
कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत जाधव यांनी विरोधकांच्यावर जोरदार टीका केली.
जाधव म्हणाले, "एका सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यावर होणारा अनावश्यक खर्च काही कारभारांच्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांचा पगार आणि वकिलाचा खर्च लाखो रुपये होत आहे. संस्थेला नुकसान कोणामुळे होते याचा सभासदांनी विचार करावा.