शिवराय तरुण मंडळाच्या महाआरतीला 'गाथा नवनाथांची ' या मालिकेतील कलाकारांची उपस्थिती
schedule07 Sep 22 person by visibility 389 categoryलाइफस्टाइल

असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर : शिवराय तरुण मंडळ ,घोरपडे गल्ली कोल्हापूर येथील महाआरती व महाप्रसाद सोहळा आज पार पडला.या महाआरती व महाप्रसाद सोहळ्याला महाराष्ट्राची लाडकी वाहिनी सोनी मराठीवरील लोकप्रिय मालिका ' गाथा नवनाथांची ' या मालिकेत मच्छिन्द्रनाथांची भूमिका साकारलेले जयेश शेवलकर व गोरक्षनाथ यांची भूमिका साकारलेले नकुल घाणेकर हे कलाकार उपस्थित होते.
दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ.योगेश जाधव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.जयेश शेवलकर आणि नकुल घाणेकर यांनी यावेळी पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या.' गाथा नवनाथांची ' ही मालिका आता 400 एपिसोड्सचा टप्पा ओलांडत आहे.यावेळी उपस्थित कलाकारांचा मंडळाकडून तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.