सतराव्या जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत आजरा तालुका प्रथम स्थानी
schedule23 Jul 22 person by visibility 860 categoryक्रीडा

गांधीनगर आवाज इंडिया प्रतिनिधी
कपिल घाटगे
गांधीनगर ता.करवीर नुकत्याच वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यांच्या मान्यतेने व एबीपी स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने गांधीनगर तालुका करवीर येथे १७ वी जिल्हास्तरीय जुनिअर व सीनियर वुशू अजिंक्यपद स्पर्धा २०२२ संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये आजारा तालुक्याने सुवर्ण, रौप्य, कास्य पदकांसह प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला.द्वितीय क्रमांक करवीर तालुका तर तृतीय क्रमांक हातकणंगले तालुका यांना मिळाला.
स्पर्धेचे उद्घाटन उदय एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रमेश भाई तनवाणी, क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे, जल अभियंता बाळासाहेब पाटोळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित पाटील,महावीर पाटील ,अध्यक्ष राजगोंडा वळीवडे, सुहास पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, वृक्षास जल अर्पण करून संपन्न झाला. यावेळी राजगोंडा वळीवडे व सुहास पाटील यांना दैनिक लोकमतचा "इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी"पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बक्षीस वितरण समारंभ अविनाश पाटील,सुभाष पासांण्णा, सतीश वडणगेकर यांच्या हस्ते व सर्व तालुका प्रमुखांच्या उपस्थित पार पडला.रेफ्री फायनल प्रमुख शहानवाज नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली सौरव पाटील, रोहित काशीद यांनी पंच म्हणून स्पर्धेचे कामकाज पाहिले. या स्पर्धेमध्ये विविध तालुक्यातून २४५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
विजयी खेळाडू पुढील प्रमाणे ः
सीनियर गट सांसू ः
सुवर्णपदक ः
शाहरुख आत्तार, आकाश पाटील ,सौरभ संकपाळ, अनिकेत पाटील, अनिल शेंडगे, अथर्व कोंडस्कर, योगेश पाटील, रोहित काशीद,ओंकार नाळे,जगदीश पवार, दिपाली दुधाळे इंद्रजीत घाटगे,भक्ती तायशेटे.
रोप्य पदक :
स्वप्निल गुजर, इरशाद मुल्ला, सुरज मिठारे चेतन ढाकर, विशाल मोरे, अमृत चव्हाण कैवल्य हरगुले,विवेक मयेकर, राजाराम पाटील,
कास्यपदक :
सौरभ सलगर,सुहास पाटील, शाहू भोसले, श्रेयस मोरे, शुभम साळवी, प्रथमेश मगदूम, अभिजीत बुरसे,सचिन सलगर.
सीनियर गट तावलू :
सुवर्णपदक : भूषण जाधव,दीपक सुतार,सुमित कांबळे, विकास गवड-२ सुवर्ण, केदार कुंभार-2 सुवर्ण, गणेश पडवळ-३ सुवर्ण, रसिका कांबळे- 2 सुवर्ण,निशा मेटके, ऋतिका शिंदे- २ सुवर्ण, रोहित शिरगावकर, गायत्री लिमकर,( ड्युअल मुले- विकास गवड,जयकिशन ओंकार पाटील) (ड्युअल मुली- ऋतिका शिंदे, काजल शिंदे, विद्या कुंभार) कुंग फू इव्हेंट्स- अक्षय लव्हटे, श्रीकांत कदम, सुहास धुमाळ ,संदीप परीट, जयप्रकाश चव्हाण, सुशांत लव्हटे, आदिती गवळी, विद्या कुंभार, काजल शिंदे,ज्योती डोईफोडे.
रोप्य पदक : विकास गवड, सुभेद कांबळे, भूषण जाधव-२ रौप्य,दीपक सुतार, प्रवीण फडके, कृष्णा हराळे ,जयकिशन सिंग,( ड्युअल- तौफिक पेंढारी, दीपक सुतार) कुंग फू इव्हेंट्स- दीपक कांबळे,सुहास धुमाळ, बळवंत रोकडे, रूपाली काळे, विद्या कुंभार.
कांस्यपदक : प्रथमेश पावले, रोहित दळवी. कुंग फू इव्हेंट्स- अभिषेक लोहार,ओंकार पाटील.
ज्युनिअर गट सांसू :
सुवर्णपदक : जहांगीर मुजावर,अथर्व शिंदे सौरभ सरवळे,सुशांत कारंडे, आयुष बागे, श्रेयश शेटे, विक्रांत यादव,प्रणव पाटील, मोहसीन मुजावर, सानिका मुधाळे, जान्हवी मोरे, राजनंदनी पाटील, मधुरा मगदूम, भाग्यश्री दुधाळे, ओंकार कोळी, मुजमीन मुजावर, आदित्य पाटील, शुभम कळमकर,प्रथमेश गुरव, यास्मिन मकानदार, नंदिनी माजगावकर, वैष्णवी देवेकर.
रौप्य पदक : पार्श्व जाधव, मिलिंद नलावडे, अर्जुन प्रजापती, रोहन पाटील, मंगेश पाटील, सही कावले, धनश्री लोहार, प्रीती कांबळे, रुची सिंग, संकेत कदम, मुदुसिंग खान,प्रेरणा कांबळे.
कांस्यपदक : शुभम पाटील, कार्तिक पाटील, शाहिद कुरणे, सत्यजित काशीद, केदार खांडेकर, धनंजय साधूगडे, वरूण पाटील ,साहिल बोटे, क्रिश मलकेकर, सिद्धी कदम, शुभांगी दुबे,श्वेता समुद्रे, तेजस्विनी सुतार ,नेहा पाटोळे.
जुनिअर गट तावलू:
सुवर्णपदक : स्वरूप पाटील- २सुवर्ण, कौशिक गावडे- ३ सुवर्ण, हर्षल पाटील, शुभूती कांबळे- २ सुवर्ण, दिशा पाटील,संयुक्ता आनंद,समृद्धी मनपाडळे,( कुंग फू इव्हेंट्स आयुष पुनाळकर, मंदार पवार, नागराज रेडियर, सार्थक पुरेकर, आकाश बिराजदार, काजल यादव, अर्पिता चौगुले )