जलद बुद्धिबळ स्पर्धेत अंशुल चुयेकर याचा उत्कृष्ट बुद्धिबळपटू म्हणून सन्मान
schedule04 Nov 22 person by visibility 608 categoryक्रीडा

हातकणंगलेतील एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत अंशुल चुयेकर याचा उत्कृष्ट बुद्धिबळपटू म्हणून सन्मान
कोल्हापूर :
हातकणंगले येथील "आय ॲम कलाम फाउंडेशन" व "श्री.अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले" यांच्या संयुक्त विद्यमाने 'एकदिवसीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले होते.
अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू म्हणून सेंट झेवियर्सच्या अंशुल चुयेकर याची निवड झाली.
याबद्दल फादर रत्नाकर दुशिंग,फादर अँड्रू फर्नांडिस,फादर विक्रम यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचा सत्कार करण्यात आला.
प्रीतम घोडके,आंतरराष्ट्रीय पंच भारतेश्वर चौगुले, क्रीडाशिक्षक अल्ताफ कुरेशी,आलम फर्नाडिस,मनीषा शिर्के यांचे त्याला मार्गदर्शन लागले.
सदर स्पर्धेसाठी स्थानिक कोल्हापूरसह, सांगली, सातारा, पुणे, कोकण व कर्नाटक मधील एकूण 160 नामवंत बुद्धिबळपटू सहभागी होते.