+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule05 Jan 24 person by visibility 202 categoryआरोग्य


कोल्हापूर: ता: कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संतोष पाटील यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे बुधवार दि.०३/०१/२०२४ इ.रोजी सदिच्‍छा भेट दिली. त्यावेळी गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे संचालक अभिजीत तायशेटे यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय येथे सत्कार करण्‍यात आला.

          यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील म्हणाले कि, महाराष्ट्र व संपूर्ण देशामधील एक अग्रगण्य सहकारी दूध संघ म्हणून गोकुळचा नावलौकिक आहे. दूध संकलन, दूध प्रक्रिया व विक्री या संपूर्ण साखळीमध्ये गोकुळच्यावतीने शास्त्रीय दृष्टीकोन व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाखाण्याजोगा आहे. त्यामुळेच बाजारापेठेमधील गोकुळ हा एक सहकारातील आश्वासक ब्रँड आहे असे गौरवोद्गार काढले.

          यावेळी शासनामार्फत लाळ खुरकत, लम्पी, थायलेरिया या लसी वेळेवरती उपलब्ध करून देणे संबंधी व जनावरांच्या लसीकरणासाठी वंध्यत्व निवारण शिबिरासाठी गावोगावी खोडी उभी करण्यात यावी या विषयावरती चर्चा करण्यात आली. या चर्चेवेळी श्री.संतोष पाटील म्हणाले कि, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व गोकुळचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांची संयुक्तपणे तिमाही आढावा मिटिंग व्हावी जेणे करून शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनाची माहिती दूध उत्पादकांना समजेल व यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होईल.

          गोकुळच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या बायोगॅस प्रकल्प, स्लरी प्रकल्प तसेच जनावरांच्यासाठी आयुर्वेद्क उपचार पद्धती, वासरू संगोपन योजना, भविष्य कल्याण निधी या विविध उपक्रमांची माहिती कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी दिली.

          यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद बाबर, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, सहा.महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक (पशुसंवर्धन) डॉ.उदय मोगले, व्यवस्थापक (संकलन) शरद तुरंबेकर, सुधाकर पाटील, उदय पाटील, आर.बी.पाटील व संघाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.