+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...!
schedule24 Dec 22 person by visibility 211 categoryउद्योग
-आकर्षक विद्युत रोषणाई
-सांताक्लॉज देणार मुलांना भेटवस्तू
- रॉक बँडवर धम्माल मस्तीची संधी
- विविध आऊटलेटवर आकर्षक ऑफर

कोल्हापूर/ प्रतिनिधी

दक्षिण महाराष्ट्रातील अग्रगण्य शॉपिंग सेंटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'डीवायपी सिटी मॉल' मध्ये 'ख्रिसमस' व 'न्यु इयर' सेलिब्रेशन सुरू झाले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, रॉक बँडची साथ, विविध आऊटलेटवर डिस्काउंट ऑफर आणि रविवारी ख्रिसमससाठी सांताक्लॉजकडून भेटवस्तू मिळवण्याची व धम्माल मस्तीची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.

  कोल्हापूरचा वाढता विस्तार व भविष्यकालीन गरजा ओळखून दूरदृष्टीचे नेतृत्व डॉ. संजय डी. पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'डीवायपी सीटी' मॉल शहराच्या वैभवात भर घालत आहे. खरेदी, खानपान, करमणूक व खेळण्याचा आनंद या ठिकाणी लुटता येईल. 

    ख्रिसमस व नववर्षाच्या स्वागतासाठी 'डीवायपी सीटी' मध्ये 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत हे सेलिब्रेशन होणार आहे. लहान मुलांना फोटो भूत, रॉक बँडच्या तालावर रविवारी 'ख्रिसमस सेलिब्रेशन'चा आनंद लुटता येईल. सांताक्लॉजकडून यावेळी मुलांना खाऊ व भेटवस्तूही मिळणार आहेत. 31 डिसेंबर रोजीही रॉक बँडच्या साथीने याठिकाणी नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे.

    या सेलिब्रेशन निमित्त ग्राहकांसाठी विविध आकर्षक ऑफर ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये फूड कोर्टमध्ये 10 टक्के सूट मिळणार आहे. तसेच 
'शॉपर्स स्टॉप'सह अन्य आऊटलेटवर 26 जानेवारीपर्यंत 50 टक्केपर्यंतची सूट मिळणार आहे. 

    सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यत मॉलची सेवा सुरु असेल. आपल्या खरेदीचा आनंद द्विगुणीत करत 'डीवायपी सीटी' सोबत ख्रिसमस व नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याचे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.