
कोल्हापूर: KOP माझा डिजिटल न्यूज चॅनल /पोर्टल यांच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा राजर्षी शाहू समाजभान राज्यस्तरीय पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व इतर सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या बौद्ध प्रणाली चॅरिटेबल ट्रस्ट सिध्दार्थ नगर कोल्हापूर यांना दिनांक १०/९/२०२२ रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमात मा.शिक्षक आमदार जयंत असगांवकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी उपस्थित ट्रस्टचे अध्यक्ष आयु. सुशीलकुमार बापुसाहेब कोल्हटकर यांनी आपल्या मातोश्री आयु.कमल बापूसाहेब कोल्हटकर यांना स्विकारण्यास सांगितले.
यावेळी ट्रस्टचे सचिव सुबोधकुमार कोल्हटकर,प्रबोधकुमार कोल्हटकर, उपाध्यक्ष आयु.सोनिया कोल्हटकर, सदस्य - मनाली कोल्हटकर,शुक्रांती कोल्हटकर, वृषाली कोल्हटकर, प्रज्ञा कोल्हटकर,व परिवारातील सर्व सदस्य प्रज्वल,अथर्व,श्रावस्ती,अभेद यांच्या उपस्थितीत तसेच शिक्षक नेते दादा लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला . यावेळी KOP माझा चॅनल/ पोर्टल चे प्रमुख राजेंद्र कोरे सरांनी ट्रस्टच्या उपक्रमाची माहिती सविस्तर सर्वाना दिली. या पुरस्काराने ट्रस्टची जबाबदारी आणखी वाढली आहे, ती जबाबदारी ट्रस्ट समर्थपणे पार पाडेल अशी आशा व्यक्त केली.