+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule20 Apr 23 person by visibility 262 categoryलाइफस्टाइल
*_विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 132 जयंती निमित्त स्वराज्य तालीम मंडळ संयुक्त राजेंद्रनगर यांची समतेचा संदेश देणारी भैव्य मिरवणूक_*

कोल्हापूर आवाज इंडिया

   स्वराज्य तालीम मंडळाच्या वतीन 11 एप्रिल ते 16 एप्रिल *भिमजन्मोत्सव भिमफेस्टीवल 2023*
 चे आयोजन करण्यात आले होते. 11एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत 1ली ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी विवीध स्पर्धेचे आयोजन केले होते व भिमजन्मोत्सव सोहळाची 16 एपिला रोजी भैव्य एतिहासिक मिरवणुकीने सांगता करण्यात आली 
या मिरवणुकीचे उद्घाटन *समाज कल्याण आयुक्त विशाल कुमार लोंढे साहेब* यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केरून व दिप प्रज्वलन आर पी आय चे प्रा. शहाजी कांबळे सर यांच्या हास्ते करून भैव्य ऐतिहासिक मिरवनुकीला सुरवात करण्यात आली. या मिरवणुकीत चे मेन केंद्र बिंदू व वैशिष्ट्य म्हणजे विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत असतानाचा जगातील पहिला पुतळा *थोर समाज सुधारक भाई माधवराव बागल* यांच्या पुढाकाराने 1950 साली बिंदु चौक येथे बसवण्यात आला आहे. त्या बिंदू चौकाची प्रतिकृती या मिरवणुकीत साकारण्यात आली होती व हा इतिहास समस्त कोल्हापूर करांना माहित व्हावा म्हणून या मिरवणुकीत हा देखावा साकारण्यात आला होता. तसेच बहुजन समाजातील सर्वच महापुरुषांचे कटाउट या मिरवणुकीच्या चित्ररथात लावण्यात आले होते.
हि मिरवणुक राजेंद्र नगर मधुन सुरवात होउन एस सी सी बोर्ड, सायबर चौक, बाईचा पुतळा, राजारामपुरी, बागल चौक , पार्वतीटाॅकी, उमा टाॅकी, मार्गे बिंदू चौक येथे सामुहिक त्रिशरंण पंचशिल घेऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली. तसेच मिरवणुकीत मार्गावरील सर्व महापुरुषांना मंडळाच्या वतिने पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या मिरवणुकीला प्रमुख उपस्थितीत म्हणून मंडळाचे आधारस्तंभ व संस्थापक मा.सुखदेव बुधाळकर,राजारापुरीचे पोलीस निरीक्षण अनिल तनपुरे साहेब आंबेडकरी चळवळीचे नेते बाळासाहेब भोसले , अजय कुरणे, बाबासो काबळे ,मुस्ताक मलबारी, संजय लोखंडे तसेच मंडळाचे मिरवणुक अध्यक्ष लक्ष्मन उर्फ काळबा कांबळे, उपाध्यक्ष अरविंद कुचेकर, संग्राम सोनवणे, उत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रविण बनसोड,उपाध्यक्ष अशोक शिवशरण चंद्रकांत शिवशरण खजानिस सुरेश आठवले,व शिवराम बुध्याळकर पंकज आठवले, नामदेव नागटीळे भारत प्रक्षाळे अक्षय रजपुत समाधान बनसोडे संजय गुदगे कुमार वाघमारे कुणाल लोखंडे चेतन कांबळे रंगनाथ शिवशरण सौरभ बुध्याळकर तसेच भागातील दोन ते अडिज हजार भिम सैनिक व महिला भगिनी उपस्थित होत्या.