डॉ. संजय डी पाटील यांच्या हस्ते हॉस्पिटल प्रीमियर लीगचे उदघाटन
schedule16 Dec 22 person by visibility 480 categoryक्रीडा

- डी वाय पाटील हॉस्पिटलच्या वतीने आयोजन
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट आयोजित 'हाॉस्पिटल प्रीमियर लिग' क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ झाला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झाले. शहरातील १२ हॉस्पिटलचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून अंतीम सामना २० डिसेंबरला होणार आहे.
डॉ. डी. वाय. पाटील हाॉस्पिटल कदमवाडीच्या मैदानावर हे सामने होत आहेत. सकाळी 11 वाजता डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. डॉ. पाटील यांच्याहस्ते नाणेफेक करून पहिल्या सामन्याला प्रारंभ झाला. यावेळी कुलगुरु डॉ. राकेशकुमार मुदगल, रजिस्टर डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैशाली गायकवाड, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, उप कुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, सिध्दीविनायक हाॉस्पिटलचे डॉ. संजय देसाई, सनराईज हाॉस्पिटलचे डॉ. अभिजित कोराणे, डायमंड हाॉस्पिटलचे डॉ. विलास नाईक, सचिन हाॉस्पिटलचे डॉ. सचिन पाटील, दत्त साई हाॉस्पिटलचे डॉ. विरेंद्र कानडीकर, सिध्दीविनायक हाॉस्पिटलचे डॉ. शिवशंकर मर्दके, डॉ. अशिष नलवडे यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सनराईज हाॉस्पिटल, दत्त साई हाॉस्पिटल, सिध्दीविनायक हाॉस्पिटल, ऑरेंज हाॉस्पिटल, टुलिप हाॉस्पिटल, डायमंड हाॉस्पिटल, अथायू हाॉस्पिटल, ॲस्टिर आधार, अंतरंग हाॉस्पिटल असे १२ संघ सहभागी झाले असून या स्पर्धेचा अंतिम सामना २० डिसेंबरला होणार आहे.
शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात सिद्धगिरी हॉस्पिटलने दत्तसाई हॉस्पिटलवर विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात अस्टर आधार हॉस्पिटलने अथायु हॉस्पिटल संघावर विजय मिळवला तर तिसऱ्या सामन्यात सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने डी. वाय. पाटील हॉस्पिटल (अ) संघावर विजय मिळवला.