
कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी)
बिंदू चौकासह कोल्हापूर शहराच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या शिवाजंनी फाउंडेशन तर्फे आझाद गल्ली येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले.
म्हसोबा आझाद मंडळ ट्रस्ट, गुजरी कॉर्नर आझाद गल्ली कोल्हापूर या परिसरात सीसीटीव्हीची गरज होती.
काही महिन्यापूर्वी या परिसरातील अनेक नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे मीटर चोरीला गेले होते.यासह या परिसरातील नागरिकांची सुरक्षा सुद्धा महत्त्वाची होती.
अंबाबाई मंदिराला येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते.भाविकांची सुरक्षा विचारात घेता या ठिकाणी अजित पवार यांच्या सहकार्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले.
यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह, ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश लांडगे उपाध्यक्ष अभिजीत ओतारी, विराट ओतारी, बबलू नाईक, ओमकार इंगवले दिलीप इंगवले, विजय करजगार, आदी मान्यवर उपस्थित होते.