
कोल्हापूर :
मागील उसाचे 400 रुपये आणि चालू उसाला पहिला हफ्ता 3500 रुपये मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले.
तावडे हॉटेल चौकातील गांधीनगर फाटा येथे स्वाभिमानीचे कार्यकर्ते जमले आणि मागील उसाच्या हफ्त्याची मागणी करत चक्काजाम आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला असून मागील हफ्ता द्यावा यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प होऊन वाहनानच्या रांगा लागल्या होत्या. काहीवेळानंतर पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली.या आंदोलनामध्ये संजय चौगले, राजू रेपे, आप्पासो धनवडे, रावसाहेब पाटील, राजू सौदे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.