+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule25 Aug 22 person by visibility 197 categoryउद्योग

असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट मार्फत दिला जाणारा उद्योग रत्न पुरस्कार चंद्रशेखर डोली यांना प्रदान करण्यात आला. चंद्रशेखर डोली हे मयुरा ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत . ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ आणि हावरे इंजिनियर्स अँड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुरेश हावरे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .

यावेळी महाराष्ट्र बँकेने उद्योजकांसाठी असलेल्या विविध योजनांबद्दल माहिती दिली .तसेच विविध उद्योजकांनी आपले अनुभव शेअर केले. यावेळी प्रायोजक सहप्रयोजकांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला सिद्धेश मोहिते यांनी ज्युरी कमिटी अध्यक्ष संजय शेटे यांचा परिचय करून दिला. संजय शेटे आपल्या मनोगतात म्हणाले ,कोरोना काळात घरी बसून 300 कोटींचा व्यवसाय सॅटर्डे क्लब ने केला हे खरच कौतुकास्पद आहे. सॅटर्डे क्लब छोट्या उद्योजकांना सोबत घेऊन आपली वाटचाल करीत आहे हे खरंच आनंददायी आहे.

यानंतर इंद्रनील बंकापुरे यांनी चंद्रशेखर डोली यांना दिल्या जाणाऱ्या मानपत्राचे वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते चंद्रशेखर डोली यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी चंद्रशेखर डोली यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

काय म्हणाले चंद्रशेखर डोली - 

 ते आपल्या मनोगतात म्हणाले ,कोल्हापुरात मी जेव्हा आलो तेव्हा माझ्याकडे दहा पैसे सुद्धा खिशात नव्हते. पण आज जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वर्षाला 56 कोटी इन्कम टॅक्स भरतो. आणि वार्षिक उलाढाल 250 कोटी रुपयांची आहे. माझ्या कंपनीत 1000 कामगार काम करतात .तसेच 150 लोक कार्यालयीन कामकाज करतात. सुरुवातीला मी बेळगाव मधून ये - जा करायचो.यानंतर 1978 ला बेळगाव मधून कोल्हापूरला आलो. घर भाड्याने घेतले आणि जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 1 फेब्रुवारी 1980 मध्ये छोटासा व्यवसाय उभा केला.आज याच व्यवसायाचा मोठा वटवृक्ष उभा असल्याचे दिसत आहे.हे माझे एकट्याचे श्रेय नसून माझ्यासोबत काम करणाऱ्या कामगारांचे, सहकाऱ्यांचे श्रेय आहे. काही वेळा व्यवसायात अपयश आले पण खचून न जाता प्रामाणिकपणे काम करत राहिलो. परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय वृद्धी केली.

सॅटर्डे क्लब नवउद्योजकांना उभारी देण्याचे काम करत आहे. त्यांना व्यवसायात मदत करत आहे ,हे खरच कौतुकास्पद आहे. असे ते सॅटर्डे क्लब बद्दल बोलताना म्हणाले. यावेळी मंचावर विशाल मंडलिक ,डॉ.अजित मराठे संजय शेटे, पिराजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.