+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust अॅड. दिलशाद मुजावर यांना मरणोत्तर “अरुणोदय पुरस्काराचे आज वितरण adjustगोकुळ’ मार्फत आमदार पी.एन.पाटील साहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना adjustडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल १०० टक्के* adjust*डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या* *१९ विद्यार्थ्यांची बजाज कंपनीमध्ये निवड* adjustडॉ. प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा adjustS3 सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग* adjust*प्रा. प्रविण माने यांना पीएच. डी.* adjustडी वाय पाटील फार्मसी मध्ये* *‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन* adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट*
schedule09 Jun 23 person by visibility 64 category
 
कोल्हापूर : लहान मुलांना आपल्या दारात खेळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. लहान बालकांचा हा हक्क आहे. त्यांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवू नका, अशी कानउघाडणी `चाइल्ड लाइन` संस्थेने संबधितांची केली. जिवबा नाना जाधव पार्क परिसरातील `त्या` कुटुंबाची भेट घेऊन वस्तुस्थितीची शहानिशा केली. संबधितांनी भविष्यात सहकार्य केले नसल्यास पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

`चाइल्ड लाइन` संस्थेच्या कोल्हापुरातील प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर राधानगरी रोडवरील जिवबा नाना जाधव पार्क येथे एका आठवड्यापूर्वी 
मुलांच्या खेळण्याला काही जणांनी विरोध केला. त्या विरोधात काही पालकांनी बालकांसाठी काम करत असलेल्या संस्थाकडे धाव घेतली. या पैकी `चाइल्ड लाइन` संस्थेने या घटनेची तत्काळ दखल घेतली. त्यांनी जिवबा नाना जाधव पार्कातील `त्या` कुटुंबाची भेट घेऊन बालहक्कांची माहिती सांगून कानउघाडणी केली. दरम्यान परिसरात मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण होण्यासाठी मनपा आयुक्त आणि भविष्यात बालकांच्या हक्कांवर कोणीही गदा आणू नये, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाला निवेदन देणार असल्याचे संबधित पालकांनी सांगितले. दरम्यान संबधित महापालिकेचा कामगार आहे. मुलांच्या खेळण्याला विरोध होत असल्याने नागरिकांच्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.