+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule21 Jul 23 person by visibility 314 categoryशैक्षणिकशैक्षणिक

कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर मार्फत दोन दिवसीय ई सेवा केंद्र साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेचे दिनांक 23 व 24 जुलै रोजी आयोजन करण्यात आले असून इच्छुकांनी प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रकल्प अधिकारी वनिता पाटील यांनी केले आहे. 
कार्यशाळेमध्ये स्वतःचे ई सेवा केंद्र चालू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती देण्यात येणार आहे. उदा. पॅन कार्ड सेवा नवीन व दुरुस्ती, लहान मुलांचे, विवाहानंतरचे पॅन कार्ड यासह भविष्य निर्वाह निधी, केवायसी-पीएफ ट्रान्सफर, कामगार कार्ड, ई श्रम कार्ड, इ गॅजेट्स (राजपत्र), शॉप अॅक्ट, फूड लायसन्स, मतदान सेवा, जीवन प्रमाणपत्र, उद्योग आधार, सातबारा ८ अ, प्रॉपर्टी कार्ड, अपंग प्रमाणपत्र, महावितरण-कनेक्शन अर्ज, रिचार्ज पॉईंट, डिश रिचार्ज, मोबाईल रिचार्ज विषयी परिपूर्ण माहिती प्रात्यक्षिकासह दिली जाईल. 
कार्यशाळा पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही श्रीमती पाटील यांनी कळविले आहे.