आजपासून देशभरात ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू....
schedule20 Jul 20 person by visibility 1026 categoryलाइफस्टाइलसामाजिक

मुंबई (प्रतिनिधी): ग्राहक संरक्षण कायदा 2019 (Consumer Protection Act 2019) आजपासून संपूर्ण देशभरात लागू करण्यात आला असून सरकार कडून गुरुवारी म्हणजेच, 15 जुलै रोजी देशभरात कायदा लागू करण्यासाठी अधिसुचना जारी करण्यात आली होती. नवीन ग्राहक संरक्षण कायदा जुन्या ग्राहक संरक्षण कायदा 1986 ची जागा घेणार आहे. त्यामुळे जुना कायदा कालबाह्य होणारअसून नवीन कायद्यांतर्गत ग्राहकांना अनेक नवे अधिकार मिळणार आहेत. हा कायदा जानेवारी 2020 मध्ये लागू करण्यात येणार होता. परंतु, काही कारणामुळे ते शक्य झालं नाही. त्यानंतर यासंदर्भात तारिख मार्च महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली होती मात्र, मार्चमहिन्यापासून देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यानंतर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यातआला. त्या मुळे याकाळात ते शक्य झाले नाही.
ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना बळ मिळालं असून त्यांची फसवणूक झाल्यास त्यांना ग्राहक मंचाकडे दाद मागता येणार आहे. खासकरून ऑनलाईन व्यवहारांमध्ये ग्राहकांच्या सोयींकडे करण्यात आलेले दुर्लक्षं कंपन्यांना महागात पडू शकते. नव्या कायद्यांतर्गत ग्राहकांची दिशाभूल करणार्या जाहिराती देण्याऱ्या कंपन्यांवरही कारवाई करण्यात येणार असून नवीन ग्राहक संरक्षण कायदा लागू झाल्यानंतर ग्राहकांच्या तक्रांरींचे निरसन लवकर होण्यास मदत होणार आहे. नव्या कायद्यांतर्गत नव्या कायद्यांतर्गत ग्राहक न्यायालयांसह केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) तयार करण्यात आले असून ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे प्राधिकरण स्थापनकेले गेले आहे. नव्या कायद्यांतर्गत ग्राहक कोणताही माल खरेदी करण्यापूर्वीच सीसीपीएकडे वस्तूंच्या गुणवत्तेबद्दल तक्रार करू शकतात.