अवनी व एकटी संस्थेचा पर्यावरण पूरक गणेश विसर्जन कार्यास हातभार ;जलप्रदूषण कमी होण्यास मदत
schedule20 Sep 21 person by visibility 619 categoryसंपादकीय
कोल्हापूर : गेल्या दहा वर्षापासून अवनी व एकटी संस्था पर्यावरण पूरक गणेश उत्सवात सहभागी होऊन निर्माल्य वर्गीकरणाचे काम अखंडीतपणे करीत आहे. निर्माल्य मध्ये येणारे फुले, हार, प्लास्टिक सजावटीच्या वस्तू यांचे वर्गीकरण अवनी व एकटी संस्थेच्या माध्यमातून होत असते.
यंदाच्या घरगुती गणेश विसर्जना मध्ये अवनी व एकटी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भाविकांचे प्रबोधन तसेच निर्माल्य वर्गीकरणाचे काम केले. कोल्हापूर वासियांच्या गणेश मूर्ती नदीपात्र तसेच तलावांमध्ये विसर्जित न करता जलकुंभात विसर्जन करण्यासाठी भाविकांच्या श्रध्येच्या मान ठेवून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मन परिवर्तन.
संस्थेच्या माध्यमातून उभा असलेल्या कचरावेचक महिलांच्या संघटनेचा या कार्यासाठी सहभाग लाभला. कोल्हापुरातील संध्यामठ, तोरस्कर चौक, जामदार चौक, कोटीतीर्थ, पंचगंगा घाट, इरानी खन, तांबट कमान, राजघाट, रंकाळा टॉवर येथे व अनंत चतुर्दशी वेळी येणारे निर्माल्य वर्गीकरणाचे काम कचरावेचक महिला परिसर विकास भगिनी यांच्या मदतीने पार पाडले.
कोल्हापूर महानगरपालिका व प्रशासनावरील भार कमी होण्यासाठी मदत झाली. पंचगंगा नदी, रंकाळा तलाव, कोटितीर्थ तलाव, कळंबा तलाव या ठिकाणी होणाऱ्या गणेश मूर्ती व निर्माल्य विसर्जनामुळे पाण्याचे होणारे प्रदूषण दुर्गंधी याला नक्कीच आळा बसला.
या निर्माल्य वर्गीकरणातून जवळपास सव्वाशे हून अधिक टन कचऱ्याची आवक झाली. कचरावेचक भगिनींच्या माध्यमातून निर्माल्यातून प्लास्टिक पूर्णपणे वेगळे करण्यात आले. 125 कचरावेचक भगिनींना या उपक्रमातून रोजगार मिळाला. संस्थेच्या वाशी येथील जागेमध्ये या निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे.
या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते गायत्री मेनन , रमेश कारंडे, इनरव्हील क्लब, हेमंत पाटील, पंचगंगा घाट संवर्धन समिती, झंवर ग्रुप छत्रपती शाहू कॅन्सर रिसर्च फाउंडेशन, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशन सर्विसिंग सेंटर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, उपाध्यक्ष संजय पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली वनिता कांबळे, जैनुद्दीन पन्हाळकर, सचिन ठाणेकर, सविता कांबळे,अन्नपूर्णा कोगले, जयश्री कांबळे, किरण नाईक, शिवकिरण पेठकर, इमरान शेख, विक्रांत जाधव, शाहरुख आटपाडे, अजय पाटील, प्रसाद शिंदे अभिजित जाधव, अविनाश शिंदे, प्रियांका पवार, प्रमोद पाटील, मनीषा धमोने, विठ्ठल पवार, अमर कांबळे सहभागी झाले.