+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustविशाल अनिल आवडे यांना पुरस्कार adjustउद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार adjustशाही दसरा महोत्सवानिमित्त शुक्रवारी पारंपरिक वेशभूषा दिवस* adjustपुढील पाच वर्षात आणखी जोमाने काम करणार : आ. जयश्री जाधव adjustलोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून *दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर* adjustहळदी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाजीराव चौगले adjustराज्यातील गरजूंपर्यंत प्रबोधनातून शासकीय योजनाही पोहोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* adjustकिरण लोहार यांचा सन्मान
schedule20 Jul 22 person by visibility 4105 categoryसामाजिक
इनरव्हील सनराईज क्लब मुळे समाज सशक्त होण्यासाठी हातभार : डॉ दुर्गादास पांडे
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील डॉक्टरांचा सन्मान
    कोल्हापूर सनराइज ही संस्था आरोग्य क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मदतकार्य करत आहे हे कौतुकास्पद असून क्लबच्या अशा उपकरणामुळे समाज सशक्त होण्यासाठी हातभार लागत असल्याचे प्रतिपादन आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉक्टर दुर्गादास पांडे यांनी काढले. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम आल्यामुळे क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. अतिरिक्त संचालक डॉक्टर उज्वला माने, सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात,बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ उमेश कदम, क्लब च्या अध्यक्ष सोनाली पटेल व सचिव प्रिया मेंच प्रमुख उपस्थित होते.

     पुढे बोलताना डॉक्टर दुर्गादास पांडे म्हणाले की राष्ट्रीय बाल स्वास्थ्य आरोग्य कार्यक्रमातील सर्व कर्मचारी अगदी खेडोपाडी जाऊन भविष्यातील पिढ्या आरोग्याच्या बाबतीत सुदृढ करण्यासाठी झटत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बालकांच्या १९७ हृदय शस्त्रक्रिया व २५९१ इतर शस्त्रक्रिया मोफत करण्यात आलेले आहेत. यांच्या कामाच्या जोरावरच जिल्हा राज्यात प्रथम आला आहे. इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजने या कर्मचाऱ्यांच्या कामाची घेतलेली दखल नक्कीच अभिमानास्पद आहे.
        क्लबचे अध्यक्ष सोनाली पटेल प्रास्ताविकामध्ये म्हणाल्या की, क्लब च्या वतीने जिल्ह्यातील
तळागाळातील प्रत्येक गरजूपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम केले जाते. आरोग्य, शैक्षणिक व महिला
सक्षमीकरण या क्षेत्रामध्ये मदत केली गेली आहे. जिथे गरज तिथे इनरव्हील सनराइज पोहोचायचा प्रयत्न नक्की करेल असेही त्या म्हणाल्या. यापुढे ही क्लब च्या वतीने गरजूना मदत केली जाणार आहे.
  
 यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक देसाई, आभार शिल्पा अष्टेकर यांनी केले.कार्यक्रमास मकरंद चौधरी, प्रज्ञा संकपाळ,सुरेखा माने, शर्मिला खोत, मनीषा जाधव सपना भालकर,संध्या देवडकर आणि इतर क्लब सदस्य उपस्थित होते.