Awaj India
Register
Breaking : bolt
रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ*डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सर्वसाधारण विजेतेपद*लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय :आमदार सतेज पाटील आनदराव पाटील चुयेकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७%नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्केडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल ९९.१७ टक्के*मित्र-मैत्रिण नाते किती ग्रेट?निवडणुकीनंतर लाडकी बहीण राज्य सरकारला सावत्र झाली; आमदार सतेज पाटील यांची टिका...शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज ; अरुण डोंगळेशालेय आयडी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : प्रवीणभाई माणगावे

जाहिरात

 

शिवसेनेच्या वतीने “राज्याभिषेक सोहळा” उत्साहात संपन्न*

schedule06 Jun 23 person by visibility 125 category


कोल्हापूर दि.०६: छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि राज्याभिषेक करून हिंदूंच्या गुलामगिरीच्या मानसिकतेला छेद दिला व समाजात अस्मितेची द्वाही फिरविली, यातून महाराजांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सर्व भूमिपुत्रांना, या देशात आता भूमिपुत्रांचे राज्य निर्माण झाले आहे, असे आश्वस्त केले. शिवराज्याभिषेक सोहळा हा तमाम शिवभक्तांसाठी पर्वणीच असते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण राज्यभरासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी छ.शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने जोरदार आयोजन करण्यात आले होते.

          यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन होऊन छ.शिवरायांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक अर्पण करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समस्त शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्या वतीने छ. शिवरायाना मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “हर हर महादेव”, “छत्रपती शिवाजी महाराज कि जय” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून नागरिकांना साखर – पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी युवासेना कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा संपर्कप्रमुख ऋतुराज क्षीरसागर, महिला आघाडी महानगरप्रमुख सौ.मंगलताई साळोखे, समन्वयक श्रीमती पूजा भोर, शहरप्रमुख सौ.पवित्रा रांगणेकर, सौ.गौरी माळदकर, सौ.पूजा कामते, श्रीमती मीनाताई पोतदार, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, कपिल केसरकर, दीपक चव्हाण, सुरेश माने, अंकुश निपाणीकर, सचिन भोळे, उदय शिंदे, अमर क्षीरसागर, निलेश हंकारे, रियाज बागवान, श्रीकांत मंडलिक, राजू कदम, रणजीत मंडलिक, क्रांतीकुमार पाटील, ओंकार परमणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes