+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule03 Jun 23 person by visibility 67 category

  कोल्हापूर/प्रतिनिधी
डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडाची विद्यार्थिनी व राष्ट्रीय छात्र सेनेची (एन.सी.सी.) छात्रा वैष्णवी प्रकाश साळोखे हिची युनायटेड किंगडम येथील कॅम्पसाठी भारतीय पथकात निवड झाली आहे. या कॅम्पमध्ये देशभरातील १० कॅडेट्सची निवड झाली असून त्यात महाराष्ट्रातून निवड झालेली वैष्णवी ही एकमेव कॅडेट आहे.
  डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्ष अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. यावर्षी २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या प्रधानमंत्री रॅलीमध्ये ती सहभागी झाली होती. त्यानंतर आता युनायटेड किंगडम येथे होणाऱ्या कॅम्पसाठी ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. २०२३-२४ च्या ‘युथ एक्स्चेंज प्रोग्राम’ अंतर्गत ही निवड झाली आहे. युनायटेड किंगडम येथे ५ ते १९ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या कॅम्पमध्ये ती सहभागी होणार आहे.
   महाविद्यालयात 2022-23 वर्षांपासून एन.सी.सी. युनिट सुरू झाले आहे. पहिल्याच वर्षी या युनीटची छात्रा वैष्णवी हिची प्रथम थेट राष्ट्रीय पातळीवरील रॅलीसाठी आणि त्यानंतर युनायटेड किंगडम येथील कॅम्पसाठी निवड झाली आहे. 
  या निवडीबद्दल वैष्णवीचे संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए.के. गुप्ता यांनी अभिनंदन केले. प्राचार्य डॉ संतोष चेडे व रजिस्ट्रार डॉ एल. व्ही. मालदे यांचे प्रोत्साहन लाभले. डीन स्टूडेंट अफेअर्स डॉ. राजेंद्र रायकर आणि एन. सी. सी. समन्वयक डॉ. राहुल महाजन यांचे तिला मार्गदर्शन लाभले.