डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये 'आर्किटेक्ट इन सोशल सेक्टर' विषयावर व्याख्यान संपन्न
schedule06 Mar 24 person by visibility 258 categoryशैक्षणिक

कोल्हापूर
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये आर्किटेक्ट इन सोशल सेक्टर या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. शेल्टर असोसिएट पुणेच्या मुख्य आर्किटेक्ट प्रतिमा जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आर्किटेक्ट प्रतिमा जोशी गेले ३१ वर्षे महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील झोपडपट्ट्यांचे पुनर्विकासाचे काम करत आहेत. गेल्या वर्षीपासून त्या कोल्हापूरमधील बोंद्रेनगर वसाहतीवर कार्यरत आहेत.
सदर कार्यक्रमामध्ये त्यांनी विदयार्थ्यांना झोपडपट्टी पुनर्विकासासंबंधी माहिती दिली. विकसनशील देशांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकासाचे काम करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या संदर्भात बोलताना जोशी म्हणाल्या, एखाद्या वसाहतीचा पुनर्विकास करताना तेथील राहिवासींचे राहणीमान ,सरासरी कुटुंब संख्या, व्यवसाय, त्यांच्या अडचणी व मत समजावून घेत व या सर्व गष्टींचा अभ्यास करून त्यांना अनुकूल अशी घराची रचना केली. या पद्धतीला उत्तम प्रतिसाद देखील लोकांकडून मिळत गेला.आर्किटेक्टसचे सामाजिक क्षेत्रामधील महत्त्व, झोपडपट्टी पुनर्विकास व त्यासंदर्भातील नियम व अटी इ. अनेक गोष्टींची माहिती विदयार्थ्यांना सदर कार्यक्रमातून मिळाली. कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात प्रश्नोतराचा तास घेण्यात आला.
यावेळी बोलताना आर्कि.जोशी यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री सतेज
उर्फ बंटी पाटील यांनी पुनर्विकास कामांमध्ये दिलेले योगदान व केलेले सहकार्य हे अतिशय अनमोल ठरले असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.खदिजा शेख व आर्यन आरख या विदयार्थ्यांनी केले तर नियोजन प्रा. मनजीत जाधव यांनी केले.
यावेळी आर्किटेक्चर विभागप्रमुख प्रा. इंद्रजित जाधव, माजी विभागप्रमुख प्रा. रवींद्र सावंत, प्रा. नीला जिरंगे
व सर्व प्राध्यापक सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतूराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के.गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे
यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.