+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule14 Feb 23 person by visibility 246 categoryक्रीडा

कोल्हापूर:
डी वाय पाटील ग्रुपच्या वतीने विद्यापीठाचे कुलपती डॉ संजय डी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी भव्य क्रिकेट मॅच स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने सलग दुसरा विजय मिळविला तर संघाचे उपकर्णधार किशोर मोरे हे दोन्हीही मॅच चे मॅन ऑफ द मॅच ठरले.
एटीयु संघाचा पहिला सामना मेडिकल कॉलेज संघ कोल्हापूर यांच्याशी झाला. एटीयु संघाने १०९ धावांचे तगडे आव्हान दिले होते पण मेडिकल कॉलेज संघ अवघ्या ५५ धावातच गारद झाला.
दुसरा सामना नर्सिंग कॉलेज कदमवाडी संघाबरोबर झाला त्यांच्यापुढे ही एटीयु संघाने ७६ धावांचे आव्हान दिले पण त्यांचा ही संघ ५३ धावात आटोपला.
किशोर मोरे यांनी पहिल्या मॅच मध्ये २६ चेंडूत ७३ धावा तर दुसऱ्या मॅच मध्ये २७ धावा व महत्वपूर्ण २ विकेट घेतल्या त्यामुळेच आज ते अव्वालस्थानी आहेत.
पहिल्या सामन्यात डॉ गुरुनाथ मोटे व किशोर मोरे यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेली. राजवर्धन तोडकर व सौरभ पाटील यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करीत संघाच्या अवांतर धावा वाचविल्या.
डॉ दीपक शिंदे, डॉ. गुरुनाथ मोटे व सचिन व्हनवडे यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली.
संघाचे कर्णधार प्रा.दिग्विजय मोहिते यांनी याबद्दल आनंद व्यक्त करीत यशाचे सर्व श्रेय संपूर्ण टीम ला दिले.
यामध्ये कर्णधार दिग्विजय मोहिते, उपकर्णधार किशोर मोरे, गुरुनाथ मोटे, राजवर्धन तोडकर, विशाल पुनदीकर, जयदीप पाटील, जयंत घाटगे, अभिजित शिंदे, विनायक शिंदे, दीपक शिंदे, सौरभ पाटील, संग्राम पाटील, सचिन व्हनवडे, चंद्रमोहन पवार, शंकर पुजारी, योगेश चिमटे, उत्कर्ष आवळेकर यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल कुलगुरू डॉ के प्रथापन व कुलसचिव डॉ जे ए खोत यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.