+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत* *डी. वाय. पाटील अभियांत्रिकी संघ प्रथम* adjustमितभाषी संयमी आणि विकासकामांची जाण असलेल्या अमल महाडिकांना जनता पुन्हा आमदार करेल - महादेव जानकर adjustsamajkalyan;इतर मागास बहुजन कल्याण samajkalyan विभागांतर्गत शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 5 मार्चपर्यंत अर्ज करा adjustrupalichakanakar,mahilaayog; बालविवाह रोखण्यासाठी विवाहकार्यात सहभागी होणाऱ्यांवरही कारवाई करा adjustgokuldudh sangh;दूध उत्पादकांच्या आर्थिक उत्कर्षा मध्ये गोकुळचे मोठे योगदान ! adjustprakashambedkar,mahavikasaghadi,lokasabha:आपली ताकद बघा आणि मग मागा असे प्रकाश आंबेडकर का म्हणत आहेत adjustdypatil-kolhapur; डी वाय पाटील अभियांत्रीकीच्यावतीने बहिरेश्वर येथे डीजीपीएस- ड्रोनद्वारे नकाशा करण्याची कार्यशाळा संपन्न adjust*भाजपाच्या निवडणूक संकल्प पत्रासाठी सूचना पाठवा : विजय जाधव adjustज्ञानदानाचा वारसा चालविणारे शिंदे कुटुंबीय adjustअक्षरवेल' मध्ये उद्याचे सुरेश भट, मधुकर केचे दडलेले आहेत ; बबन सराडकर
schedule27 Sep 23 person by visibility 166 categoryशैक्षणिकशैक्षणिक

कोल्हापूर:
डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांना प्रतिष्ठित जस्ट ऍग्रीकल्चर ग्रुपकडून '' अवॉर्ड ऑफ ऑनर'' पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.  

डॉ.के. प्रथापन हे डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरु म्हणून सध्या कार्यरत आहेत. एक आदर्श प्राध्यापक ते उत्तम शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपल्या प्रशासनाचा अमीट ठसा उमटविला आहे. डॉ.प्रथापन हे भारत सरकार च्या आयसीएआर, एफडीए, एफएसएसएआय, नॅक , युजीसी व इतर समित्यांवर मूल्यमापन अधिकारी म्हणून काम पाहतात. 

    शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये आयईईई कडून २०२२ साली 'इलाईट अकॅडमिसिएन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच संशोधन क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 'बेस्ट इंटरनॅशनल रिव्युवर' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अनेक शासकीय व निमशासकीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते आजीव सदस्य आहेत. 

या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना डॉ.प्रथापन म्हणाले '' हा पुरस्कार माझ्यासाठी अनमोल आहे. या पुरस्कार रूपाने कामाची पोहचपावती मिळाली आहे. पुरस्कार कर्तुत्वाला चालना देतात व नवी ऊर्जा देतात. पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढेल.येणाऱ्या काळात डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही उत्तम दर्जाचे पदवीधर तयार करू व यासाठी फॉरेन युनिव्हर्सिटी कॉलॅबोरेशन, रिसर्च, पेटंट फाइल्स, व्हॅल्यू ऍडेड कोर्सेस, ऍग्री व फूड टेक मध्ये सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स व अन्य महत्वाच्या कोर्सेस वर भर देऊन विद्यापीठाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवू.'' 

या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए. के. गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांनी डॉ. प्रथापन यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.