22 डिसेंबर:अयनदिन आज सर्वात लहान दिवस व रात्र मोठी
schedule22 Dec 21 person by visibility 979 categoryलाइफस्टाइल

आज 22 डिसेंबर अयनदिन आहे. 21 जून आणि 22 डिसेंबर हे दोन्ही दिवस अयनदिन म्हणून ओळखले जातात.22 डिसेंबर ते 21 जून हा कालावधी सूर्याच्या उत्तरायणाचा असतो. त्यामुळे 22 डिसेंबर पासून सूर्य हा उत्तरेकडील बाजूकडे सरकत जातो. मकरवृत्ताकडे सूर्याचे सरकणे चालू राहते. म्हणून 22 डिसेंबर या दिवसास दक्षिण अयनदिन किंवा हिवाळा अयनदिन असे ही म्हणतात.या दिवशी उत्तर गोलार्धात दिवस सर्वात लहान व रात्र सर्वात मोठी असते. तर 21 जून ला सूर्य कर्कवृत्ताकडे येतो. सूर्य विषुववृत्ताकडे दक्षिणेकडे सरकू लागतो त्यामुळे 21 जून हा दिवस उत्तर अयनदिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी सर्वात मोठा दिवस असतो व सर्वात लहान रात्र असते. अयनदिना दिवशी सूर्य त्याच्या सर्वात उत्तरेच्या किंवा दक्षिणेच्या स्थानी असतो. वर्षातील 21 जून व 22 डिसेंबर या दोन दिवशी अशी स्थिती असते. सूर्याचे उत्तरेकडे जाणे यास उत्तरायण आणि दक्षिणेकडे जाणे यास दक्षिणायन म्हणतात.
डाॅ. युवराज शंकर मोटे
भूगोल व पर्यावरण अभ्यासक,
कोल्हापूर