धम्म संघ कोल्हापूर आयोजित धम्मसहल*
schedule07 Nov 22 person by visibility 571 categoryलाइफस्टाइल

कोल्हापूर - बौद्ध स्थळे ही बौद्ध धम्माचा विचार, विस्तार, परंपरा आणि संस्कृतीची साक्ष देतात. बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार बौद्ध स्थळांचे जतन व संवर्धन होण्यासाठी येथे आपण वारंवार भेटी दिल्या पाहिजेत. असे उदगार प्राचार्य डॉ हरीश भालेराव यांनी काढले, धम्म संघ कोल्हापूर आयोजित 'बौद्ध स्थळांची सहल' २०२२ चे प्रारंभी भीम नगर कोल्हापूर येथे सहलीतील सहभागी सदस्यांना मार्गदर्शनप्रसंगी काढले. यावेळी त्यांच्या हस्ते प्रा. अशोक चोकाककर संकलीत व संपादित "बौद्ध स्थळांची सहल २०२२" या पुस्तिकेचे प्रकाशन झाले.
सहल समिती प्रमुख आयु प्रकाश मालेकर यांनी सहलीत १९ महिला व २१ पुरुष सहभागी झाले आहेत व ही सहल दि ६,७,८ नोव्हेंबर अशी असून गुगवाड, बीजर्गी, विजापूर, गुलबर्गा, सन्नती, कनगणहल्ली, ऐहोळ, बदामी या ठिकाणी होत आहे असे सांगितले.
या सहलीत आयु सचिन कपूर, प्रा डॉ चंद्रकांत कुरणे, प्रा डॉ डी एल कांबळे, प्रा सिद्धार्थ पद्माकर, मनोहर भोसले, सुनीलकुमार कांबळे, रमेश रत्नाकर, सुनील कांबळे, प्रवीण देशमुख, विजय जाधव, प्रज्ञा कपूर, पुष्पा सुब्रमनी, सरिता साळोखे, सुवर्णा कुरणे, फुलाबाई कांबळे, शकुंतला लाटवडेकर, प्रणाली चोकाककर, शकुंतला सावंत आदी सहभागी झाले आहेत.