कोल्हापूर : आवाज इंडिया
*यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन महोत्सव साजरा करण्यात आला.
*हा महासोहळा 20 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत संपन्न होणार आहे*
*नियोजित कार्यक्रमानुसार पहिले पुष्प घेण्यात आले.*
ब्राईट आर्मीचे संस्थापक आयु. दयानंद मेहतर व भारतीय बौद्ध समाज कोल्हापूरचे अध्यक्ष आयु रंगराव पांडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध मुर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.
*त्यानंतर सामुदायिक पंचशील ग्रहण करून उपस्थित धम्म बांधवांना रंगराव पांडे यांनी 22 प्रतिज्ञा व धम्म देसना दिले त्यानंतर आयु. दयानंद मेहतर सर उपस्थितांना जहाल अशा आपल्या शैलीत प्रबोधन पर मार्गदर्शन केले.*
कार्यक्रमास राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. अनिल तनपुरे साहेब तसेच स्वराज्य तालीम मंडळाचे संस्थापक संस्थापक सुखदेव दादा बुध्याळकर, उषाताई गवंडी मॅडम, माजी अध्यक्ष पंकज आठवले, उत्सव कमिटी अध्यक्ष प्रवीण बनसोडे, मिरवणूक कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण कांबळे (k k), तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते राजेंद्र नगर मधील धम्म बांधव बाल उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.