+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustवर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणार्या ड्रायव्हरांचे वेतन कपात adjustरत्नागिरी व सिंधुदुर्ग नागरी संरक्षण कार्यालयाच्या "उपनियंत्रक गट अ" पदासाठी* *इच्छुकांनी नावे कळवावीत* adjustदक्षिण मधील मतदारांना सुज्ञ उमेदवाराचे आवाहन adjustभाजपचे बंडखोर वसंत पाटील दक्षिण मधून निवडणुकीच्या तयारीत adjustसुकेशनी सुरेश कांबळे ऊर्फ सई स्वप्निल डिगे नेट परीक्षा उत्तीर्ण adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी
schedule14 Jun 24 person by visibility 219 categoryराजकीय
कोल्हापूर ;
                 बारा वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावास मंजुरी मिळण्यास होत असलेला विलंब आणि डीसीपीएस/ एनपीएस योजनेतील अनेक प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने १४ जून रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी दिली आहे.

               प्राथमिक शिक्षकांना एकाच पदावर एकाच वेतनावर बारा वर्षे पूर्ण झाल्यास वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ दिला जातो. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून डिसेंबर 2022 पर्यंत बारा वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लाभ देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रस्तावांची मागणी केली होती. पण जवळजवळ दोन वर्ष होत आलेली आहेत तरीही सदर वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही. प्रस्तावांमध्ये प्रशासनाकडून वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी काढण्यात येत आहेत. एकाच वेळी त्रुटी न काढता एक त्रुटी पूर्ण झाल्यानंतर दुसरी त्रुटी निदर्शनास आणून दिली जात आहे. या सर्व एकंदरीत प्रक्रियेस प्रचंड विलंब लागत असून पात्र शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या अनुषंगाने या अगोदर जिल्हा प्रशासनाच्या वारंवार भेटी घेण्यात आल्या आहेत. पण प्रस्ताव मंजुरी होण्यास विलंब लागत आहे. या बाबीमुळे कर्मचाऱ्यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला आहे. 

              १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) नावाची पेन्शन योजना चालू करण्यात आली होती. सदर योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये (एनपीएस) समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे डीसीपीएस योजनेतील कर्मचाऱ्यांच्या रकमा एनपीएस मध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया चालू आहे. पण या अनुषंगाने येत असलेल्या अडचणी, आंतरजिल्हा बदलीने गेलेले आणि आलेल्या शिक्षकांच्या रकमाबाबत निर्माण झालेल्या अडचणी, एनपीएस अकाउंट मध्ये प्रत्येक महिन्याचे पैसे वर्ग होण्यासाठी होत असलेला विलंब, इतर खात्यातून शिक्षक खात्यामध्ये बदली करून आलेले कर्मचाऱ्यांची एनपीएस अकाउंट ट्रान्सफर करणे बाबत, जाहिरात व अधिसूचना 2005 पूर्वीची असलेल्या कर्मचाऱ्यांचे विकल्प प्रस्ताव, एनपीएस अकाउंट मध्ये चुकलेले माहिती दुरुस्त करणे होत असलेली दिरंगाई या सर्व गोष्टींवर समाधानकारक कार्यवाही व्हावी, अशी शिक्षक कर्मचारी बांधवांची मागणी आहे. 

             या प्रश्नांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने १४ जून रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी केले आहे. यावेळी संघटनेचे राज्यसह कोषाध्यक्ष श्रीनाथराव पाटील, शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन अमर वरुटे, जिल्हा मार्गदर्शक संजय भोसले, बी एल कांबळे, राहुल कांबळे, जिल्हा सरचिटणीस विजय रामाने, जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पांढरे, जिल्हा कोषाध्यक्ष निलेश कारंडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड, विश्वनाथ बोराटे, गजानन कुंभार, संजय पाटील, अमोल गायकवाड, जिल्हा मीडिया प्रमुख मारुती फाळके, जिल्हा प्रवक्ते प्रमोद पाटील, जिल्हा आयटी विभाग प्रमुख सुनील पाटील, जिल्हा महिलाध्यक्षा आरती पोवार, जिल्हा महिला सरचिटणीस संगीता कडूकर उपस्थित होते.