महाराष्ट्रातील आहार संस्कृती
schedule02 Sep 20 person by visibility 1148 categoryसंपादकीय
महाराष्ट्रातील भौगोलिक विभाग व आहार संस्कृती
आहार महत्त्वाचा घटक आहे. आरोग्य चांगले राखण्यासाठी आहार पौष्टिक, सात्विक व संतुलित हवा. आहार संतुलित असेल तर शरीराला पोषक व चांगली जीवनसत्वे मिळतात व शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. अन्न ही प्राथमिक गरज आहे. मानवी शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्वे अ, ब, क, ड, ई व के यातून शरीराला पोषक घटक मिळतात व आरोग्य चांगले राहते. अ जीवनसत्व हे प्रामुख्याने गाजर, रताळी, टोमॅटो, पालक, तांबडा भोपळा, सोयाबीन, कोथिंबीर, संत्री, आंबा, मासे, अंडे व लोणी इत्यादी मधून प्राप्त होते. ब जीवनसत्व हे गव्हाचे पिठ, हिरव्या पालेभाज्या, बदाम, अर्क्रोड, तांदुळ, द्राक्षे, बटाटे, ओला वटाना, शेंगदाणे, मका, नारळ, कोबी इत्यादी मधून मिळते. क जीवनसत्व लिंबू, संत्री आवळा, मोसंबी यामधून मिळते. ड जीवनसत्व मासे, दुध, तुप, लोणी व सुर्यप्रकाशातून मिळते. ई जीवनसत्व वनस्पती तेल, हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बल्क इत्यादीतून मिळते. के जीवनसत्व हे पालेभाज्या व कोबी यामधून मिळते. मानवी शरीराला ही जीवनसत्वे आवश्यक आहेत व त्यामुळे संसर्गजन्य आहारापासून शरीराचे संरक्षण होते. बदलत चाललेल्या जीवनशैलीमध्ये फास्टफूड व विदेशी पर्दाथचा समावेश आहारात वाढला व त्याचे परिणाम शरीरावर दिसू लागले. कोरोना मुळे पुन्हा संतुलित व पौष्ठीक आहाराचे महत्व वाढू लागले आहे. भारतीय आहारपध्दती जगात चांगली आहे. देशातील विविध प्रदेशात भौगोलिक स्थिती नुसार आहारशैली मध्ये वैशिष्ठये दिसून येतात. महाराष्ट्राला सुध्दा आहार संस्कृती चांगली व वैशिष्टयेपूर्ण आहे. पूरणपोळी हे राज्याच्या आहाराच वैशिष्टये आहे. राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विर्दभ असे भौगोलिक विभाग आहेत. प्रत्येक विभागात आहारामध्ये विविधता आहे. भूरचना, हवामान, मृदा, जलप्रणाली या भौगोलिक घटकांचा परिणाम त्यावर होतो त्यामुळे प्रत्येक विभागात आहारशैली वेगळी आहे. कोकण विभागात आहारात भात, वरी, मासे त्याचबरोबर लोकल रानभाज्यांचा समावेश केला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ज्वारी, बाजरी, गहू, तांदुळ व विविध भाज्या त्या मध्ये तांदळी,कुर्डु,घोळी,चिरगोळी,पात्री,रानमेथी,चंदन बटवा,करडई, शेवग्याच्या पानांची भाजी इत्यादी समावेश होतो. खानदेश विभागात बाजरी, तांदळाची खिचडी, पिटल, खुडा (खर्डा), खुड मिरची भाजी, शेवभाजी, बाजरीचे पापड, बाजरी वड्यांची भाजी, नंदुरबार मधील अदिवासी भागात नाचणी, वरी, मक्याची भाकरी, गुळाचा चहा व विविध रानभाज्यांचा समावेश आहे. मराठवाडा विभागामध्ये ज्वारी, गहु व बाजरी यांचा समावेश होतो. विर्दभ विभागात आहारशैलीमध्ये विविधता आहे ज्वारी, गहू, फळे व भाज्या यांचा समावेश आहारात होतो. राज्यातील प्रत्येक विभागाची व जिल्हाची आहारामध्ये विविधता आहे. भौगोलिक घटकाचा प्रभाव ही त्यावर होतो. राज्यांमध्ये साजरे करणारे विविध धार्मिक सण, उत्सव व परंपरा यांच्या स्वरूपानुसार विविध प्रकारचे पर्दाथ बनवले जातात मकर संक्रातीला तिळाची पोळी, विविध प्रकारच्या भाज्या ऐकत्र करून बनवलेले भाजी (भोगी), होळी निमित्त पुरण पोळी, गणेश चतुर्थी ला मोदक, दसरा-दिवाळी, रमजान, नाताळ व विविध उत्सवानिमित्त विविध प्रकारचे पदार्थही बनवले जातात आणि त्या माध्यमातून पोष्टीक आणि सात्विक आहार मिळत. बदलत्या जीवनशैलीमध्ये आहार पध्दती मध्ये बदल झाला व त्याचा परिणाम शरीरावर झाला. प्राकृतिक घटकाचा परिणाम हा आहारावर ही झालेला दिसून येत आहे. महाराष्ट्रातील आहारामधील काही निवडक पर्दाथ म्हणजे वैशिष्टये असणारे पिटल भाकरी, जळगाव नंदुरबार या भागातील शेवभाजी, सोलापूरची कडक ज्वारीची भाकरी चटणी, कोल्हापूरातील काही भागात डांगर, सांगली -आटपाडी चिगळची भाजी, पात्रेचीभाजी. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विर्दभातील लोकल पर्दाथ आहारशैलीतून लुप्त होत चाललेले आहेत त्या पर्दाथांना जपण गरजेच आहे कारण ते पोष्टीक होते पण बदलत्या जीवनशैलीत ते मागे पडत आहे. कोरोना काळात आज पुन्हा सात्विक व पौष्टिक आहाराची गरज वाटत आहे. शहरीकरण जस झाल तस राहणीमान बदलले बरोबर ही आहार ही बदलला. सध्या कोरोना संकटात पुन्हा पोष्टीक व सात्विक आहाराला महत्व प्राप्त झाले ज्या पर्दाथापासून चांगल्या प्रकारचे पोष्टीक घटक मिळतात त्यांचा समावेश आहारात असावा.
डाॅ. युवराज शंकर मोटे
भूगोल व पर्यावरण विभाग,
बाबा नाईक महाविद्यालय, कोकरूड
मो. 9923497593
ईमेल: ysmote@gmail.com
डाॅ. युवराज शंकर मोटे
भूगोल व पर्यावरण विभाग,
बाबा नाईक महाविद्यालय, कोकरूड
मो. 9923497593
ईमेल: ysmote@gmail.com