रविवारी दिगंबर जैन युवा चेतना परिषद
schedule23 Aug 23 person by visibility 1073 category

कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी)
दिगंबर जैन समाजातील तरुणांच्या उत्कर्षासाठी व त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी १४ ते ३० वर्षे वयोगटातील तरुण -तरुणी यांच्यासाठी चेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ऑगस्ट ( दि.२७) सकाळी ९.३० ते दुपारी १.३० पर्यंत हिंद को-ऑप सोसायटी कॉलनी हॉल, रुईकर कॉलनी, कोल्हापूर या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन शुभम बिंदगे यांनी पत्रकार परिषदेत केले.
या परिषदेत सकाळी दहा वाजता सौरभ ढबू यांचे करिअर तर शुभम बिंदगे यांचे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन होणार आहे.
नियोजित परिषदेची उद्दिष्टे समाजाच्या प्रगतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र करणे,समाजातील तरुणाईत असणाऱ्या बौद्धिक प्रतिभा व कौशल्यांना व्यासपीठ तयार करून देणे,समाजात आपल्या धार्मिक मान्यता, संस्कृती, इतिहास व आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या वारसा स्थळांची ओळख व त्यांच्याबाबत जागरूकता निर्माण करणे, विविध क्षेत्रात कार्यरत तरुणांच्या आर्थिक व सामाजिक समस्या जाणून घेणे, समाजोत्थानासाठी सामाजिक कार्यात युवतींच्या सहभागावर विचार करणे यासाठी परिषदेची आयोजन केले आहे.
आपल्यातील कौशल्ये आपल्या वैयक्तिक व सामाजिक प्रगतीसाठी उपयोगी ठरू शकतात. त्यासाठी एकत्र येऊया, विचारमंथन करूया आणि उत्कर्ष साधुया असे आवाहन अभिजीत सांगरुळकर,भरत वानकुंद्रे, संजय कोठावळे शुभम दिंडगे, विजय कंदरे, सतीश पत्रावळे यांनी केले. माहितीसाठी संपर्क असा 9595733330, सिद्धी- 7057402250