इचलकरंजी/प्रतिनिधी -
महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे सचिव मिलिंद कांबळे यांची चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकपदी निवड झाल्याबदल महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चौंडेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक शिरिष कांबळे, संचालक माजी मुख्याध्यापक रामचंद्र निमणकर, केपीएल चे अध्यक्ष राहुल सातपुते, चौंडेश्वरी युवा फौंडेशनचे शितल सातपुते व मनोज खेतमर उपस्थित होते.
मिलिंद कांबळे हे राज्य पातळीवरील महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. तसेच कपिल स्मृती नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र स्पोर्टस क्लब (हॉकी) चे संस्थापक, बाळासाहेब माने स्पोर्टस अॅकॅडमी अॅण्ड डेव्हलपमेंट सेंटर उपाध्यक्ष, व्हेंचरर्स इचलकरंजी, (हायकिंग ट्रेकिंग माऊंटनेरींग) म्हणून कार्यरत आहेत. तसेच देवांग समाज इचलकरंजीचे पदाधिकारी म्हणुन कार्य केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.