
पुणे : आवाज इंडिया प्रतिनिधी
आवश्यकतेपेक्षा जास्त सीटा भरल्या की गाडीत कशी अडचण निर्माण होते. तशीच अडचण आता भाजपमध्ये झाली असल्याचे दिसत आहे.पक्ष सोडून बाहेरच्या नेत्यांना जास्त प्रवेश दिल्यामुळे काही भाजपवासीयांची कोंडी निर्माण झाली आहे. भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेघा कुलकर्णी यांची अवस्था अशीच झाली आहे.
कोथरूडच्या माजी आमदार मेघाताई कुलकर्णी सध्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर नाराज आहेत. स्वतःचा मतदार संघ चंद्रकांत दादा पाटील यांना दिला मात्र त्यांनाच अनेक कार्यक्रमातून डावलले जाते अशी टीका त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. याबाबत आपण अनेक वेळा तक्रार करून सुद्धा आपलं ऐकलं जात नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
कुलकर्णी यांना विधान परिषदेवर घेऊ असेही आश्वासन दिलं होतं. भाजपने शब्द पाळला नसल्याची टीका त्यांनी केली आहे. चांदणी चौकातील पुलाबाबतच्या कार्यक्रमात कुलकर्णी यांचे नाव नाही.वर्तमानपत्रातून वाटलेल्या पत्रकात त्यांचा नाव नसल्याचे दिसत आहे.या पुलाच्या विकास कामासाठी त्यांनी आमदार असताना प्रयत्न केले होते. त्यामध्येच नाव नसल्याकारणाने नाराजी व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय उपाध्यक्ष यांची अशी अवस्था असेल तर बाकीच्या कार्यकर्त्यांची काय अवस्था असेल याचा अंदाज न केलेला बरा अशी चर्चाही होत आहे.