
.
गगनबावडा / प्रतिनिधि :
गगनबावडा येथील परशुराम विद्यामंदिर जुनिअर कॉलेज येथे आज गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला.
श्री गगनगिरी महाराज विश्वस्त ट्रस्ट गगनबावडा, सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर व शिवविचार प्रतिष्ठान, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने सांंगशी केंद्रातील 81 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नागोजीराव माने यांनी सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर व शिव विचार प्रतिष्ठान, बार्शी हे राबवत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी गौरव जाधव यांनी प्रतिष्ठानने आतापर्यंत केलेले कार्य,उपक्रम व गडसंवर्धन याविषयी माहिती दिली. केंद्रप्रमुख आर. यु. गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्राचार्य रंगराव गोसावी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुस्ताक वडगावे, शिव विचार प्रतिष्ठान अध्यक्ष यश पवार, डॉ. श्री.सागर विभुते आदींची प्रमुख उपस्थिती होती.सूत्रसंचालन समृद्ध नाईक यांनी तर आभार रंगराव गोसावी यांनी मानले.
कार्यक्रमाला सांगशी केंद्रातील सर्व शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.