
तिसंगी : संभाजी कांबळे,सौरभ कांबळे (वेतवडे) यांनी श्री ची मूर्ती दान करत तिसंगी ग्रामपंचयतीने राबवलेल्या उपक्रमाचे स्वागत केले व पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करत पुढील पिढीसाठी नवा आदर्श निर्माण केला.मूर्ती दान केल्याबद्दल गगनबावडा बी डि ओ , तसेच तिसंगी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्यांनी त्यांचे आभार मानले.तसेच भीम बुद्ध तरुण मंडळ वेतवडे यांचे अध्यक्ष .बाबुराव जगताप, उपाध्यक्ष.तानाजी कांबळे व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.