कोल्हापूर : ता. ०६.कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक डॉ.सुजित मिणचेकर व अधिकारी यांच्या उपस्थितीत विन्रम अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि भारतातील जातीयवाद विरोधी लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ.आंबेडकरानी केले. डॉ.आंबेडकरांच्या समाज्यातील अमूल्य योगदानांचे स्मरण म्हणून आजचा दिवस देशभर महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी गोकुळ परिवाराच्या वतीने बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी गोकुळचे संचालक डॉ.सुजित मिणचेकर म्हणाले कि, बाबासाहेबांची पुण्यतिथी देशभरात महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते. संविधान निर्माता डॉ.आंबेडकर यांनी देशाला घटनेवर चालणारे राज्य दिले.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक डॉ. सुजित मिणचेकर, भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, संचालक ए.डी.चौगले (सर), अविनाश पाटील, संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, भोगावतीचे कार्यकारी संचालक संजय पाटील, सहा.महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, व्यवस्थापक (संगणक) ए.एन.जोशी, व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक (पशुसंवर्धन) डॉ.उदय मोगले, डॉ.साळुंखे, व्यवस्थापक (संकलन) एस.व्ही.तुंरबेकर, दत्तात्रय वाघरे, बी.आर.पाटील, प्रकाश आडनाईक, संग्राम मगदूम तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.