डॉ. चेतन नरकेच्या उपस्थितीत मुंबईत आंतराष्ट्रीय परिषद
schedule28 Nov 23 person by visibility 1172 categoryराजकीय

कोल्हापूर : प्रतिनिधी
गोकुळचे संचालक आणि थायलंड देशाच्या अर्थमंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार डॉ. चेतन नरके यांच्या पुढाकारातून मुंबई येथे गुरूवारी (दि. ३०) रोजी ४० देशांच्या सहभागाने आंतराष्ट्रीय परिषद होत आहे. ३० नोव्हेंबर हा थायलंडचा नॅशनल डे आहे. यानिमित्ताने मुंबई येथे होणाऱ्या या परिषदेला भारत, थायलंड, न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स आदी प्रमुख देशांचे राजदूत आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचे आयोजन डॉ. चेतन नरके यांनी केले आहे. यापरिषदेत डॉ. चेतन नरके हे भारताचे थायलंडसह सहभागी देशातील व्यापाराच्या संधी आणि भविष्यातील व्यापारवृध्दी याबाबत पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करणार आहेत. भारत, महाराष्ट्र आणि पायलट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला थायलंड तसेच या सहभागी देशात जागतिक व्यासपीठावर असलेल्या व्यापार-व्यावसायाच्या संधी, कोल्हापूर चेंम्बर्स ऑफ कॉमर्स, स्मॅक आणि गोशिमा या उद्योग संस्था, कोल्हापूर क्रिडाई, आर्किटेक्ट असोसिएशन, विविध व्यापारी आणि औद्योगिक संस्थांच्या माध्यमातून कोल्हापुरातील गुळ, चप्पल, फौंड्री उद्योग, साखर, बांधकाम आदी क्षेत्रात थायलंड देशात असलेल्या व्यापाऱ्याच्या संधीबाबत विशेष भाष्य डॉ. चेतन नरके करणार आहेत.