डॉ. कादंबरी बलकवडे यांचा राष्ट्रपतीकडून सन्मान
schedule15 Dec 23 person by visibility 491 categoryआरोग्य

कोल्हापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाच्या महासंचालक (महाराष्ट्र इनर्जी डेव्हलपमेन्ट अथॉरिटी) डॉ. कादंबरी बलकवडे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष २०२३ साठी भारत सरकारच्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार वितरण सोहळा दिल्ली येथे गुरूवारी (दि.१४) झाला. भारत सरकारच्या वर्ष 2023 साठी राज्य ऊर्जा कार्यक्षमता कार्यप्रदर्शन पुरस्कार (गट 1) क्षेत्रातील ऊर्जा संवर्धनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरवण्यात आला. महाराष्ट्र राज्य ऊर्जा कार्यक्षमता कामगिरी पुरस्कार (गट-एक) या प्रदेशातील ऊर्जा संवर्धनात केलेल्या कामगिरीचे कौतुक करून, महाराष्ट्राला भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने 2023 या वर्षासाठी पुरस्कृत केले. उर्जा बचत आणि अक्षय उर्जेचा वापरात महाराष्ट्र राज्य देशात द्वितीय ठरले. यावेळी सचिव ऊर्जा मंत्रालय, महासंचालक ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी, डायरेक्टर-जनरल ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.