+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule19 May 24 person by visibility 125 category
-शैक्षणिक , सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक,आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रवीण कोडोलीकर यांचा वाढदिवस विविध विधायक उपक्रमाने साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. संकटमोचन अशी विद्यार्थ्यांमध्ये डॉ. कोडोलीकर यांची ओळख आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय काम आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त शैक्षणिक, सामाजिक , राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
      डॉ. कोडीलेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मातृदिनाचे औचित्य साधून विचारे माळ परिसरातील कष्टकरी ,गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले . त्यानंतर श्री समर्थ श्रावणी केअर सेंटर फुलेवाडी येथे भोजनदान करून त्याठिकाणी असणाऱ्या नागरिकांसोबत गप्पा गोष्टी करीत त्यांना आनंद देत, त्यांचे आशिर्वाद घेतले. दुपारी बारा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन परिसरातील कोल्हापूर थाळी या ठिकाणी वाढदिवसानिमित्ताने गोड - धोड जेवणाचे वाटप केले. तसेच त्यांच्या निवासस्थानी मित्र परिवार व परिसरातील नागरिकांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. अनेक मान्यवरांनी शाल , पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. विधायक उपक्रमाचे आयोजन डॉ. प्रवीण कोडोलीकर वाढदिवस संयोजन समितीने केले होते.
    यावेळी अँड. मंदार पाटील,डॉ.कपिल राजहंस,अभिजित राऊत,अजिंक्य शिंदे ,विराज सुतार,राजेंद्र बनसोडे , ऋतुराज माने, महेश राठोड, रवि इनामदार ,धनराज माने, मंजीत माने ,आनंद शिंदे,रुपेश नागटिळे, व इतर मान्यवर उपस्थित होते.