म्हैस दुध उत्पादन वाढीतून आर्थिक
schedule03 Aug 22 person by visibility 248 categoryउद्योगसामाजिक

*म्हैस दुध उत्पादन वाढीतून आर्थिक*
*उन्नती साधा: आमदार सतेज पाटील*
नागाव येथे भावेश्वरी सहकारी दुध संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
नागाव/
गोकुळ संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत आहे. गोकूळसह जिल्हा बँकेच्या योजनांचा फायदा घेऊन म्हैसीच्या दुधात वाढ करून दूध उत्पादकांनी आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले. करवीर तालुक्यातील नागांव येथे श्री भावेश्वरी सहकारी दुध संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत भावेश्वरी दूध संस्थेची इमारत उभारल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी चेअरमन अनिल तेली यांचे अभिनंदन केले. दूध दरवाढीचा दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. सत्तेचा उपयोग सामान्य शेतकऱ्यासाठी व्हावा असा आमचा प्रयत्न असतो. दूध उत्पादकांच्या उन्नतीच्या योजना मांडून दूध उत्पादकांनी उत्पन्न वाढवण्यासाठी म्हैस दूध वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले. म्हैस दूध उत्पादनात करवीर तालुका मागे असल्याचे सागताना एकट्या नागांव गावामध्ये २५०0 लिटर म्हैस दूध उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. गोकूळ दूध संघाच्या योजना, जिल्हा बँक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व्याज परतावा योजनांचा लाभ देऊन करवीर तालुका म्हैस दूध उत्पन्नात अग्रेसर करण्यासाठी जिल्हा बँक संचालक, गोकुळ संचालकांनी दूध उत्पादक सम्पर्क दौरे करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांची थकीत कर्जे माफ केली, प्रामाणिक शेतकऱ्यांना पन्नास हजार रूपायांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला. कोविडमुळे वेळेत कर्जफेड करू न शकलेल्या ९२ हजार शेतकऱ्यांसाठी अटी शिथिल करण्यासाठी जिल्हा बँकेने ठराव केल्याचे त्यांनी सांगितले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास कामे सुरु आहेत. सर्वसामान्य माणसांपर्यंत शासकीय योजना पोचवल्या जात आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना दरवर्षी उत्पन्नाचा दाखल देण्याची अट घालण्यात आली आहे. गरीब महिलांना न्याय देण्यासाठी हा निर्णय रद्द व्हावा यासाठी मोर्चा काढण्याचे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांना केले.
*दूध व्यवसायामुळे शेतकऱ्याची उन्नती- आ. ऋतुराज पाटील*
आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वर्गीय चुयेकर साहेबांनी गोकुळ स्थापनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक क्रांतीला चालना दिली. ग्रामीण भागाचा विकासामध्ये दूध व्यवसाय महत्वाची भूमिका निभावत असून शेतकरी बंधुच्या आर्थिक उन्नतीसाठी गोकुळकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. युवा शेतकऱ्यानी शेती व पूरक जोडधंद्याकडे व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन नावे प्रयोग राबवावेत असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यानी यावेळी केले.
गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. डोंगराळ आणि पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या बेरकरवाडी गावाने पन्नास म्हैसी आणून गावात दूध क्रांती केली आहे. भविष्यात गोकुळ शेणही विकत घेणार असल्याचे सांगून दूध उत्पादकांच्या विकासासाठी गोकुळ दूध संघ नेहमीच पाठीशी राहील अशी ग्वाही दिली. भावेश्वरी संस्थेने म्हैस दुधास ५० रुपये आणि गाय दुधास सरसकट 31 रुपये दर दिल्याच्या निर्णयाचे त्यांनी कौतुक केले.
भावेश्वरी दूध संस्थेचे चेअरमन अनिल तेली यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संचालक शशिकांत पाटील,बाबासो चौगले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, माजी जि. प. सदस्य एकनाथ पाटील, जिल्हा बँक संचालिका स्मिता गवळी, बिद्री संचालक श्रीपती पाटील यांच्यासह भावेश्वरी दूध संस्थेचे सर्व संचालक दूध उत्पादक सभासद आणि नागांव ग्रामस्थ उपस्थित होते.