+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...!
schedule02 Jun 23 person by visibility 99 categoryराजकीय

शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिका-यांसमवेत बैठकित सूचना..

दि.९ जुन रोजी शिक्षण संस्था-युवासेना पदाधिकारी यांची व्यापक बैठक घेण्याच्या सूचना.

 महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत च्या बैठकीत चालू वर्षाच्या ॲडमिशन प्रक्रिये बाबत सविस्तर चर्चा झाली.
 बैठकीच्या सुरुवातीस शिक्षण उपसंचालक उपस्थित नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून श्री.राजेश क्षीरसागर यांनी गेली 14 वर्षे युवा सेनेच्या माध्यमातून ॲडमिशन प्रक्रिया संदर्भात मोर्चा काढला जातो, बैठक घेतली जाते,विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो,
 तरी देखील चालू वर्षी पुन्हा तेच प्रश्न, संस्थाचालकांची तीच मजोरीवर या गोष्टी विद्यार्थी हिताला मारक असून जिल्ह्यातील कुठलाही विद्यार्थी ॲडमिशन पासून वंचित राहिला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी, तसेच शिक्षण संस्थांकडून विविध डोनेशनच्या माध्यमातून होत असलेली लूट थांबवावी, तसेच शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया पारदर्शीपणे राबवावी, यासह अन्य सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 तसेच शिक्षण संस्था प्रतिनिधी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील संबंधित अधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी यांची व्यापक बैठक येत्या 9 जून रोजी घेण्याच्या सूचना श्री.राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख चेतन शिंदे यांनी शिक्षण संस्थांमधील भ्रष्ट कारभाराविषयी भाष्य करून, विद्यार्थी हिताच्या आड येणाऱ्या शिक्षण संस्था चालकांना योग्य समज देण्यात यावा, आणि तरीही न ऐकल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात घ्यावी, ही सूचना केली. तसेच कोणतीही शिक्षण संस्था ॲडमिशन प्रक्रियेत आडवणूक करत असेल तरी युवा सेनेची
संपर्क साधण्याचे आवाहन केले.
 यावेळी युवा सेनेचे शहर प्रमुख मंदार पाटील यांनी, शिक्षण संस्थांकडून आकारण्यात येणाऱ्या ट्रान्सपोर्टेशन पी, इमारत फंड, तसेच इतर लुटी बाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली.

 सदर बैठकीस सहाय्यक संचालक सुभाष चौगले, प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे, महापालिका प्रशासन अधिकारी यादव, युवा सेना संपर्कप्रमुख प्रसाद चव्हाण, युवा सेना जिल्हा सरचिटणीस कुणाल शिंदे, महानगर संघटक अक्षय कुंभार,युवा सेना शहर प्रमुख पियुष चव्हाण, शहर सरचिटणीस विपुल भंडारे, युवती सेनेच्या नम्रता भोसले, आयटी सेनेचे शहर प्रमुख सौरभ कुलकर्णी, आदि सह उपसंचालक कार्यालयातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.