फैज अली करणार केरळ ते लंडन चक्क सायकल वारी
schedule10 Sep 22 person by visibility 346 categoryक्रीडा

रोटरी मूव्हमेंट प्रायोजक
असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर : भारताच्या आझादी का अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून फैज अश्रफ अली हा तरुण केरळची राजधानी थिरुवअनंतपुरम ते लंडन असा एकूण 30,000 किमी. अंतराचा प्रवास चक्क सायकलवरून करणार असल्याची माहिती रोटरी मूव्हमेंट कोल्हापूर यांच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
35 देश,450 दिवस प्रवास 30,000 किमी. अशी ही सायकल मोहीम असणार आहे.या मोहिमेत हेल्थ केअर , हार्ट केअर यासंबंधी प्रबोधन करण्यात येणार आहे.माझ्या या आत्तापर्यंतच्या प्रवासात माझ्या पत्नीने ,मुलांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिले आहे असे फैज अली म्हणाले. यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत मांडले.शाहू मॅरेथॉनचे आयोजक किसन बापू भोसले म्हणाले,रोटरी क्लब मार्फत बरीच समाजोपयोगी कामे केली जातात,आजही या मोहिमेला रोटरीने प्रायोजकत्व दिले आहे हे खरंच कौतुकास्पद आहे.
क्रीडा भारती कोल्हापूरच्या अश्विनी पाटील म्हणाल्या,सायकल चालवणे ही आजच्या परिस्थितीची गरज आहे.इंधन बचत होते तसेच व्यायामही उत्तम होतो.कोल्हापूरचे नाव जगभर उंचावण्यात रोटरी क्लब कायमच पुढाकार घेत आहे.तसेच कोल्हापूर सायकलचे राजीव जामसंडेकर म्हणाले,घरच्यांचे प्रोत्साहन मिळणे हे नेहमीच महत्त्वाचे असते आणि ते फैज अलींना मिळत आहे हे खूपच आनंददायी आहे.यामुळे त्यांचे मनोबल नक्कीच वाढेल.
फैज अलीच्या या सायकल मोहिमेला केरळच्या क्रीडा मंत्र्यांनीही सहकार्य केले आहे.त्यांनी या मोहिमेचे कौतुक केले आहे.यावेळी बजरंग व्हराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.या पत्रकार परिषदेस अश्विनी पाटील,किसन बापू भोसले,राजीव जामसंडेकर,रो.भूषण शेंडगे,बळीराम व्हराडे,अभिजित पिंपळकर,राहुल राबाडे,सचिन बेनाडे,राजेंद्र पोंदे,अमर शेरवाडे,कविता घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते.