सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड
schedule21 Sep 22 person by visibility 337 categoryलाइफस्टाइल

असित बनगे: आवाज इंडिया प्रतिनिधी
दिल्ली : सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे.वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.मध्यंतरी त्यांची तब्बेत सुधारत असल्याची बातमी डॉक्टरांकडून मिळाली होती.पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले.गेल्या 42 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते.त्यांच्या पार्थिवावर उद्या किंवा परवा अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी झाला.अनेक मालिका व चित्रपटांमधून विनोदी भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांना हसवले.त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
हार्ट अटॅक आल्याने रुग्णालयात दाखल
राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्कआऊट करत असताना हार्ट अटॅक आला होता.यानंतर त्यांना लगेचच दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मागील 42 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते.मध्यंतरी त्यांची तब्बेत सुधारत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.प्रकृतीमध्ये सुधारणा होत असतानाच अचानक त्यांची तब्बेत बिघडली व त्यांचे निधन झाले.
राजू श्रीवास्तव यांचे चित्रपट सृष्टीतील योगदान
राजू श्रीवास्तव यांना त्यांचे चाहते गजोधर भैय्या म्हणून ओळखत होते.त्यांचा तेजाब हा पहिला चित्रपट होता.या नंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.त्यांनी बिग ब्रदर, बाजीगर ,मैने प्यार किया,बॉम्बे टू गोवा यांसारख्या अनेक चित्रपटात भूमिका साकारली.