+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule11 Nov 22 person by visibility 246 categoryउद्योग
         जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी मागील गळीत हंगामातील एफ आर पी पेक्षा वाढीव रक्कम देऊन पहिली उचल जाहीर केलेली आहे. परंतु दालमिया शुगर आसुर्ले पोर्ले यांनी मागील गळीत हंगामातील दिलेल्या रकमेपेक्षा 46 रुपये कमी देऊन शेतकऱ्यांचे नुकसान केलेले आहे. जय शिवराय किसान संघटनेने मागील वर्षी दिलेल्या दारामध्ये केंद्र सरकारने वाढवून दिलेली प्रती टन 77 रुपये मिळून पहिली उचल 3223 द्यावी, याकरता आंदोलन सुरू केलेले आहे. तसेच जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत तोडणी वाहतूक खर्चातही प्रचंड वाढ करून शेतकऱ्यांचे नुकसान केलेले आहे. व मागील गळीत हंगामातील आर एस एफ प्रमाणे हिशोब देऊन राहिलेली रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, या मागण्यांसाठी दत्त दालमियाच्या गेट समोर आंदोलन सुरू केलेले आहे.
      आजच्या आंदोलनात नागदेव वाडी येथील 88 वर्षाचे शेतकरी योद्धा दादूमामा कामिरे यांनी आंदोलनास आजारी असतानाही उपस्थित राहून, भागातील शेतकऱ्यांनी यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून, आपल्या न्याय व हक्काच्या मागण्यांसाठी पाठिंबा द्यावा असे आवाहन केले.
आजाद हिंद क्रांती संघटनेचे प्रमुख मुकुंद पाटील क.बीड यांनीही आंदोलनात प्रक्रिया सहभाग आजपासून घेतलेला आहे व जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही, तोपर्यंत जय शिवराय संघटनेसोबत लढा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले.
        आंदोलनाच्या चौथ्या दिवशी अॕडव्होकेट विजय पाटील उत्रेकर, प्रकाश पाटील,रंगराव पाटील,सोनबा धुंदरे, साबळेवाडी, नामदेव शेलार, विश्वास गुरव, कुडित्रे, आनंदराव सरनोबत, शिवाजी भोसले,अमर वारे, रमेश देसाई, आसुर्ले, दीपक जाधव, सत्यजित पाटील, बाजीराव पाटील, रामचंद्र पाटील,भुये, संभाजी साळोखे, यवलुज, पांडुपंत पाटील, साहेबाची पाटील, राजेंद्र पाटील, पांडुरंग पाटील, संजय पाटील, काजी कांबळे, महिपती कांबळे, अर्जुना आरडे, भिकाजी पाटील, करंजफेण, आदींसह सर्व भागातून शेतकऱ्यांचा पाठिंबा वाढत आहे.
     आजही प्रशासनाने आंदोलनाबाबत कोणतीही भूमिका दुपारी चार वाजेपर्यंत घेतलेली नाही. याबाबत प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांच्यात असंतोष निर्माण होऊ लागला आहे. शरद जोशी प्रणित संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव जाधव, जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, रघुनाथ दादा संघटनेचे गुणाजी शेलार, संभाजी चौगुले, यांनी उद्या शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर पासून शेतकरी संघटनेच्या वतीने पडळ फाटा, उत्रे, तालुका पन्हाळा व कोल्हापूर - रत्नागिरी रस्त्यावर कोतोली फाटा येथून ऊस वाहतूक रोखून धरण्याचा इशारा दिलेला आहे. यासाठी आंदोलनात पाठिंबा दिलेल्या सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांना घेऊन दत्त दालमिया शुगरची सर्व ऊस वाहने रोखण्यात येतील असा निर्वाणीचा इशारा यावेळी सर्वच संघटनेच्या प्रतिनिधींनी दिला.
   आज चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जय शिवराय संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन स्थळी ठाण मांडून बसलेले आहेत.
      जय शिवराय चे अध्यक्ष शिवाजी माने, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव जाधव, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, रघुनाथ दादा प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुणाजी शेलार, संभाजीराव चौगुले, विलास पाटील, नामदेव शेलार आझाद हिंद क्रांतीचे अध्यक्ष मुकुंद पाटील, आदींसह जय शिवराय चे युवराज आडनाईक, दत्ता पाटील, सदाशिव कुलकर्णी काका, गब्बर पाटील, प्रताप चव्हाण, भैरवनाथ मगदूम, शितल कांबळे,सागर माळी, रामदास वड्ड, तातोबा कोळी सर, धनपाल पाटील, यांनी उद्या शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर पासून दत्त दालमिया शुगरची ऊस वाहतूक रोखणार आहोत असे जाहीर केले.